NZ vs ENG : कसोटी क्रिकेटमध्ये धमाका..! फॉलोऑन मिळालेल्या न्यूझीलंडचा रोमहर्षक विजय; पाहा सेलिब्रेशन

WhatsApp Group

New Zealand Defeated England By 1 Run : क्रिकेटविश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. न्यूझीलंडने इंग्लंडविरुद्धच्या (NZ vs ENG) दुसऱ्या कसोटीत एका धावेने रोमहर्षक विजय नोंदवला. या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, यजमान किवी संघाची इंग्लंडविरुद्धची अवस्था अतिशय वाईट होती. त्यांना फॉलोऑन होईपर्यंत खेळावे लागले. दुसऱ्या डावात केन विल्यमसनने शतक झळकावत संघाला ४५० धावांच्या पुढे नेले. अखेरच्या दिवशी इंग्लंडला विजयासाठी २५८ धावा करायच्या होत्या. पण इंग्लंडचा संघ २५६ धावांत गारद झाला.

यापूर्वी २००१ मध्येही टीम इंडियाने असाच पराक्रम केला होता आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध फॉलोऑन केल्यानंतर १७१ धावांनी विजय मिळवला होता. आता न्यूझीलंडनेही २२ वर्षांनंतर मायदेशात असेच केले. २ सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी झाली. हॅरी ब्रुक हा मालिकावीर ठरला. कसोटी क्रिकेटच्या इतिहासावर नजर टाकली तर एखाद्या संघाला फॉलोऑननंतर विजय मिळण्याची ही चौथी वेळ आहे.

हेही वाचा – Mutual Fund : म्युच्युअल फंडात पैसे गुंतवणाऱ्यांसाठी खुशखबर..! ‘या’ गोष्टीत झाली वाढ

इंग्लंडने पहिल्या डावात ४३५ धावा केल्या होत्या. हॅरी ब्रूकने १८६ आणि जो रूटने नाबाद १५३ धावा केल्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा संघ केवळ २०९ धावा करून बाद झाला. स्टुअर्ट ब्रॉडने ४ बळी घेतले. यानंतर इंग्लिश कर्णधार बेन स्टोक्सने यजमान संघाला फॉलोऑन दिला. दुसऱ्या डावात सलामीवीर फलंदाज टॉम लॅथम आणि डेव्हन कॉनवे यांनी पहिल्या विकेटसाठी १४९ धावांची मोठी भागीदारी केली. लॅथमने ८३ आणि कॉनवेने ६१ धावा केल्या.

विल्यमसनचे सर्वोत्तम शतक

यानंतर केन विल्यमसनने १३२, टॉम ब्लंडेलने ९० आणि डॅरिल मिशेलने ५४ धावा करत संघाची धावसंख्या ४८३ धावांवर नेली. अशा स्थितीत इंग्लंडला २५८ धावांचे लक्ष्य मिळाले होते. जो रूटने पुन्हा एकदा ९५ धावा केल्या, पण तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. अवघ्या ८० धावांत संघाने ५ विकेट गमावल्या होत्या. बेन स्टोक्सने ३३ आणि बेन फॉक्सने ३५ धावा करत संघाला सांभाळले, पण त्यांना विजय मिळवता आला नाही. नील वॅग्नरने ४ आणि कर्णधार टिम साऊदीने ३ बळी घेतले.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment