वेस्ट इंडिज क्रिकेटमध्ये भूकंप..! वर्ल्डकपमध्ये घाण खेळल्यानंतर कॅप्टननं घेतला ‘मोठा’ निर्णय

WhatsApp Group

Nicholas Pooran Step Down As Captain : टी-२० विश्वचषकात वेस्ट इंडिजची कामगिरी अत्यंत खराब होती आणि सुपर-१२ टप्प्यासाठी पात्र ठरण्यात ते अपयशी ठरले. टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात विंडीजचा संघ मुख्य ड्रॉमध्ये पोहोचू न शकण्याची ही पहिलीच वेळ होती. या खराब कामगिरीनंतर विंडीज क्रिकेटमध्ये खळबळ उडाली आहे. आता निकोलस पूरनने मर्यादित षटकांच्या संघाचे कर्णधारपद सोडले आहे.

कायरन पोलार्डच्या जागी पूरनची मर्यादित षटकांमध्ये वेस्ट इंडिज संघाचा कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती आणि त्याला कर्णधारपद स्वीकारून जेमतेम सहा महिने झाले होते. त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेल्या एका दीर्घ पोस्टमध्ये पूरनने म्हटले की, कर्णधारपद सोडणे हा संघासाठी योग्य निर्णय आहे आणि त्यामुळे त्याला पुढील आयसीसी स्पर्धांच्या तयारीसाठी पुरेसा वेळ मिळेल.

हेही वाचा – बल्लारपूर क्रीडा संकुलानजीक उभे राहणार एस.एन.डी.टी. विद्यापीठाचे केंद्र

काय म्हणाला पूरन?

”टी-२० विश्वचषकातील निराशेनंतर मी कर्णधारपदाबद्दल खूप विचार केला आहे. मी अतिशय अभिमानाने आणि समर्पणाने भूमिका स्वीकारली आणि माझे सर्वस्व अर्पण केले. टी-२० विश्वचषक ही अशी गोष्ट आहे जी आपली व्याख्या करू नये. मला मार्चमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेपूर्वी आणि त्यानंतर क्रिकेट वेस्ट इंडिजला पुरेसा वेळ द्यायचा आहे”, असे निकोलस पूरनने आपल्या वक्तव्यात म्हटले आहे.

पूरन पुढे म्हणाला, ”मी विंडीज क्रिकेटसाठी पूर्णपणे वचनबद्ध आहे आणि वरिष्ठ खेळाडू म्हणून सहाय्यक भूमिका बजावत राहीन. वेस्ट इंडिजच्या मर्यादित षटकांच्या कर्णधारपदावरून पायउतार होणे संघाच्या आणि माझ्या हिताचे आहे असे मला वाटते. मी एक खेळाडू म्हणून संघाला काय देऊ शकतो यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. मी यशस्वी होऊ शकतो आणि संघाला चांगली कामगिरी देऊ शकतो.

Leave a comment