Video : अमेरिकेतही मुंबई इंडियन्स चॅम्पियन! फायनलमध्ये कॅप्टनचे 13 षटकार, ठोकलं तुफानी शतक!

WhatsApp Group

MLC 2023 Final : मेजर लीग क्रिकेट (MLC) 2023 सध्या यूएसमध्ये खेळली गेली. स्पर्धेचा अंतिम सामना सोमवारी (31 जुलै) झाला, ज्यामध्ये मुंबई इंडियन्सची फ्रेंचायझी एमआय न्यूयॉर्कने शानदार पद्धतीने विजय मिळवला. सामन्याचा हिरो ठरला वेस्ट इंडिजचा निकोलस पूरन, त्याने 40 चेंडूत शतक झळकावले. मेजर लीग क्रिकेटचा हा पहिला हंगाम होता. त्याचा अंतिम सामना एमआय न्यूयॉर्क आणि सिएटल ऑर्कास यांच्यात झाला. या विजेतेपदाच्या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना वेन पारनेलच्या नेतृत्वाखाली सिएटल संघाने 9 गडी गमावून 183 धावा केल्या.

क्विंटन डिकॉकची धडाकेबाज खेळी

सिएटल संघासाठी दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक सलामीवीर क्विंटन डिकॉकने 52 चेंडूत 87 धावांची धडाकेबाज खेळी केली. यादरम्यान त्याने 4 षटकार आणि 9 चौकार लगावले. न्यूयॉर्क संघाकडून ट्रेंट बोल्ट आणि राशिद खान यांनी 3-3 बळी घेतले. यानंतर 184 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूयॉर्क संघाची सुरुवात चांगली झाली नाही. संघाने खाते न उघडता स्टीव्हन टेलरच्या रूपाने पहिली विकेट गमावली होती. यानंतर कर्णधार आणि यष्टीरक्षक निकोलस पूरन तिसऱ्या क्रमांकावर आला आणि त्याने मोर्चा सांभाळला.

पुरणने या सामन्यात 40 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. यानंतर तो शेवटपर्यंत उभा राहिला आणि संघाला विजय मिळवून देऊनच परतला. पूरनने या सामन्यात 55 चेंडूत 137 धावांची नाबाद खेळी केली. यादरम्यान त्याने 13 षटकार आणि 10 चौकार मारले. त्याचा स्ट्राईक रेटही 249 होता. निकोलस पूरनच्या खेळीमुळे एमआय न्यूयॉर्कने 16 षटकांत 3 गडी गमावून 184 धावा करून सामना जिंकला. सिएटल संघाचा एकही गोलंदाज पूरनवर नियंत्रण ठेवू शकला नाही. पाकिस्तानी गोलंदाज इमाद वसीम आणि कर्णधार पारनेल यांना केवळ 1-1 विकेट घेता आली.

हेही वाचा – पालघरजवळ एक्स्प्रेस ट्रेनमध्ये गोळीबार, पोलिसासह चौघांचा जागीच मृत्यू!

एमआय न्यूयॉर्कचा नियमित कर्णधार कायरन पोलार्ड सध्या दुखापतीने त्रस्त आहे. दुखापतीमुळे तो एलिमिनेटर सामन्यात टेक्सास सुपर किंग्जविरुद्ध खेळू शकला नाही. पोलार्डच्या अनुपस्थितीत निकोलस पूरनने संघाची धुरा सांभाळली आहे. पोलार्ड अंतिम सामन्यातही खेळला नाही. लॉस एंजेलिस नाइट रायडर्स, मुंबई इंडियन्स न्यूयॉर्क, सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्स, सिएटल ऑर्कास, टेक्सास सुपर किंग्ज आणि वॉशिंग्टन फ्रीडम हे या स्पर्धेतील सहा संघ आहेत. बहुतेक संघ भारतीय-अमेरिकनांच्या मालकीचे आहेत. यासोबतच इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) च्या फ्रेंचायझींनीही यामध्ये संघ खरेदी केले आहेत.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment