क्रिकेटच्या इतिहासातील विचित्र घटना, बॉलरने केला ‘असा’ प्रकार, अंपायरही झोपेत!

WhatsApp Group

Eden Carson : क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं असं म्हणतात, पण इतकी विचित्र घटना तुम्ही पहिल्यांदाच ऐकली असेल. श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड महिला क्रिकेटमध्ये एक अजब घटना घडली. किवी गोलंदाज ईडन कार्सनने त्याच्या एका स्पेलमध्ये 11 षटके टाकली. एकदिवसीय क्रिकेटच्या नियमांनुसार, एक गोलंदाज जास्तीत जास्त 10 षटके टाकू शकतो, परंतु ईडन कार्सनने त्याच्या स्पेलमध्ये एक अतिरिक्त षटक टाकून सर्वांना आश्चर्यचकित केले. अंपायरच्या चुकीमुळे ईडन कार्सनचे एक अतिरिक्त षटक पडले. मात्र, त्याच्या षटकाचा सामन्यावर फारसा परिणाम झाला नाही आणि न्यूझीलंडने श्रीलंकेचा 111 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला.

कार्सनने श्रीलंकेच्या डावातील 45व्या षटकापर्यंत 10 षटकांचा कोटा पूर्ण केला होता. यात तिने सलामीवीर हर्षिता समरविक्रमासह कविशा दिलहरीची महत्त्वाची विकेट घेत 40 धावा खर्च केल्या. षटकांचा कोटा पूर्ण करूनही, कार्सनने एका टोकाकडून गोलंदाजी करणे सुरूच ठेवले आणि अंपायरने तिला रोखलेही नाही. या अतिरिक्त षटकात तिने 5 डॉट बॉलसह एक धाव खर्च केली. अशाप्रकारे, तिने 11 षटकात 41 धावा देऊन 2 गडी बाद केले. यात कार्सनने मेडन ओव्हरही टाकली.

हेही वाचा – Mahabharat : अर्जुनचं गांडीव धनुष्य का खास होतं? ‘या’ गोष्टी ऐकून चकित व्हाल!

आयसीसी महिला चॅम्पियनशिप अंतर्गत सध्या श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जात आहे. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने कर्णधार सोफी डिव्हाईन (137) आणि अमेलिया केर (108) यांच्या शतकी खेळीच्या जोरावर 329 धावा केल्या.

या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या श्रीलंकेच्या संघाची सुरुवात चांगली झाली नाही, यजमानांनी 76 धावांत 5 विकेट गमावल्या होत्या. अशा परिस्थितीत कविशा दिलहरीने 84 धावांची खेळी खेळली पण काही काळ संघाला सांभाळले पण ती श्रीलंकेला विजय मिळवून देऊ शकली नाही. तीन सामन्यांच्या मालिकेत आता 1-1 अशी बरोबरी आहे. या मालिकेतील निर्णायक सामना 3 जुलै रोजी होणार आहे.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment