Asian Games 2023 : एशियन गेम्समध्ये नेपाळच्या क्रिकेट संघाने (Nepal Cricket Team) इतिहास रचला. गट सामन्यात त्यांनी टी-20 क्रिकेटचे अनेक विक्रम मोडले. भारताने सोमवारी महिला क्रिकेटमध्ये सुवर्णपदक पटकावल्यानंतर पुरुषांच्या पहिल्याच सामन्यात विश्वविक्रमाची नोंद झाली. नेपाळने 20 षटकांत 314/3 अशी अविश्वसनीय धावसंख्या उभारली आणि टी-20 क्रिकेटमध्ये 300 धावांचा टप्पा पार करणारा पहिला संघ ठरला. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) आधीच एशियन गेम्सच्या सामन्यांना आंतरराष्ट्रीय टी-20 दर्जा दिला जाईल याची पुष्टी केली होती.
वेगवान अर्धशतक (Asian Games 2023)
याशिवाय, दीपेंद्र सिंग ऐरीने सर्वात वेगवान टी-20 अर्धशतक करण्याचा युवराज सिंगचा दीर्घकाळचा विक्रम मोडला. 2007 च्या विश्वचषकात युवराजने इंग्लंडविरुद्ध 12 चेंडूत अर्धशतक झळकावले होते. याच डावात त्याने एका षटकात सहा षटकार ठोकले. तर दीपेंद्र सिंग ऐरीने अवघ्या नऊ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने 10 चेंडूत 52 धावांची नाबाद खेळी खेळली, त्यापैकी 48 धावा षटकारांच्या जोरावर होत्या.
कुशल मल्लाने भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि दक्षिण आफ्रिकेचा स्टार फलंदाज डेव्हिड मिलर यांना मागे टाकत सर्वात वेगवान टी-20 शतक झळकावले. त्याने केवळ 34 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. तर रोहित आणि मिलरने 35 चेंडूत शतके ठोकली. मल्लाने 8 चौकार आणि 12 षटकार मारले आणि अवघ्या 50 चेंडूत 137 धावा करून नाबाद राहिला.
हेही वाचा – Petrol Diesel Price Today : आज २७ सप्टेंबर रोजी तुमच्या शहरात पेट्रोल आणि डिझेलचे दर काय ?
दोन्ही सलामीवीर 100 च्या खाली स्ट्राइक रेटने खेळत असताना नेपाळने हांगझोऊ येथील झेजियांग युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी क्रिकेट फील्डमध्ये त्यांच्या डावाची संथ सुरुवात केली होती. यानंतर मल्लाने कर्णधार रोहित पौडेलसोबत (27 चेंडूत 61 धावा) 193 धावांची भागीदारी करून डाव पुढे नेला. यानंतर दीपेंद्रने अखेरपर्यंत शानदार फलंदाजी करत विश्वविक्रम मोडीत काढला.
भारत उपांत्यपूर्व फेरीत (Asian Games 2023)
एशियन गेम्समध्ये पुरुषांच्या पहिल्या फेरीत प्रत्येकी तीन संघांचे तीन गट आहेत. प्रत्येक गटातील अव्वल क्रमांकाचा संघ उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरेल, जिथे भारत, श्रीलंका, बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान हे संघ या स्पर्धेत सामील होतील. भारताचे नेतृत्व ऋतुराज गायकवाड करणार आहे, जो नुकताच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी एकदिवसीय संघाचा भाग होता आणि पहिले दोन सामने खेळला होता.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!