Sandeep Lamichhane Suspended : अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप असलेला स्टार क्रिकेटर संदीप लामिछाने याला नेपाळ क्रिकेट असोसिएशननं गुरुवारी (८ सप्टेंबर) निलंबित केलं. नेपाळच्या राष्ट्रीय क्रिकेट संघाचा कर्णधार असलेल्या लामिछानेविरुद्ध नेपाळ न्यायालयानं अटक वॉरंट जारी केलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ वर्षीय तरुणीनं त्याच्यावर बलात्काराचा आरोप केला आहे. अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी लामिछानेविरुद्ध अटक वॉरंट जारी करण्यात आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचं नेपाळचे कार्यकारी सचिव प्रशांत बिक्रम मल्ला यांनी अधिकृत प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. काठमांडू जिल्हा न्यायालयानं लामिछानेविरुद्ध अटक वॉरंट जारी केल्यानंतर काही तासांतच हा निर्णय घेण्यात आला.
नक्की प्रकरण काय?
संदीप लामिछानेवर हॉटेलमध्ये १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी सांगितलं की, १७ वर्षीय तरुणीनं मंगळवारी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये आरोप केला आहे, २२ वर्षीय लामिछानेनं तीन आठवड्यांपूर्वी एका हॉटेलमध्ये तिच्यावर बलात्कार केला. नोंदवलेल्या गुन्ह्यानुसार, लामिछाने यानं २१ ऑगस्ट रोजी मुलीला काठमांडू आणि भक्तपूर येथे विविध ठिकाणी नेलं. त्याच रात्री काठमांडूतील एका हॉटेलमध्ये त्यानं तिच्यावर बलात्कार केला. या घटनेसंदर्भात सीसीटीव्ही फुटेजसह इतर पुरावे गोळा करत असल्याचं पोलिसांनी सांगितलं. लामिछानेनं हे आरोप फेटाळून लावले आहेत आणि निर्दोष असल्याची बाजू मांडली आहे. तो म्हणाला, ”मी निर्दोष आहे. मी सीपीएलमधून सुटी घेणार आहे. माझ्या देशात मी परत जाण्याचा निर्णय घेतला आहे. मी या सर्व बिनबुडाच्या आरोपांना सामोरे जाण्यास तयार आहे.”
हेही वाचा – Asia Cup 2022 IND Vs AFG : विराटनं SIX मारून ठोकलं शतक..! संपवली १०२० दिवसांची प्रतीक्षा; पाहा तो क्षण!
Press Release pic.twitter.com/sprvYRLIFQ
— CAN (@CricketNep) September 8, 2022
Sandeep Lamichhane writes on facebook : pic.twitter.com/oEMqV4WFfG
— trending Nepal (@trending_Nepal) September 9, 2022
हेही वाचा – एलिझाबेथनं कमल हसनच्या फिल्मचं शूटिंग सेटवर जाऊन पाहिलं; पण तो पिक्चरंच रिलिज झाला नाही!
२२ वर्षीय संदीप कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये जमैका तल्लावाह संघाकडून खेळत आहे. मात्र आता संघानं संदीपला सोडलं आहे. संदीप लवकरच नेपाळला परतणार असून काठमांडू येथील न्यायालयात हजर होणार आहे. संदीप नेपाळचा स्टार खेळाडू आहे. जगभरातील क्रिकेट लीग खेळणारा तो देशातील एकमेव खेळाडू आहे. आयपीएलमध्ये खेळणारा संदीप हा नेपाळचा पहिला क्रिकेटर आहे. यासोबतच तो ऑस्ट्रेलियन बिग बॅश लीग, कॅरेबियन प्रीमियर लीग आणि लंका प्रीमियर लीगसह अनेक लीगमध्ये खेळत आहे.
An arrest warrant has been issued against Nepal skipper Sandeep Lamichhane for raping a minor girlhttps://t.co/Zou8UHcIdu
— CricTracker (@Cricketracker) September 8, 2022
आयपीएलमुळं प्रसिद्धी
लेगस्पिनर संदीप लामिछाने २०१८ मध्ये पहिल्यांदा प्रकाशझोतात आला, जेव्हा तो पहिल्यांदा आयपीएल खेळला होता. तेव्हा तो फक्त १७ वर्षांचा होता. लामिछानेला दिल्ली डेअरडेव्हिल्सनं २० लाख रुपयांना विकत घेतले. त्यानं आयपीएलमध्ये ९ सामने खेळले असून १३ विकेट घेतल्या आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये लामिछानेनं नेपाळ संघासाठी ४४ टी-२० सामन्यांत ८५ विकेट घेतल्या आहेत.