‘ब्रदर फ्रॉम अनदर मदर’, नीरज चोप्राच्या आईकडून अर्शद नदीमचं कौतुक; म्हणाली, “तो माझा मुलगा….”

WhatsApp Group

Neeraj Chopra’s Mother Praises Arshad Nadeem : नीरज चोप्राचे पॅरिस ऑलिम्पिकमधील सुवर्ण जिंकणे हुकले. भालाफेकच्या अंतिम फेरीत त्याला रौप्यपदक मिळाले. पाकिस्तानच्या अर्शद नदीमने पॅरिस ऑलिम्पिक भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकले. जेव्हा नीरजच्या आईला अर्शदबद्दल विचारण्यात आले तेव्हा तिने सांगितले की, तोही तिचा मुलगा आहे.

नीरजची आई म्हणाली, “आजच्यासाठी खूप खूप अभिनंदन. सर्व मुले कठोर परिश्रम करतात. रौप्यही आमच्यासाठी सोन्याच्या बरोबरीचं आहे. नीरजच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात येणार असून त्याच्यासाठी चुरमाही करण्यात येणार आहे. आम्ही अजिबात निराश नाही, आम्ही खूप आनंदी आहोत. त्याला दुखापत झाली होती आणि त्याच्या हातावर शस्त्रक्रिया करावी लागली होती, पण आम्हाला पहिल्यांदाच सुवर्ण मिळाले, यावेळी आम्हाला रौप्य मिळाले. ज्याने सुवर्ण जिंकले त्याच्यासाठी मी खूप आनंदी आहे. तो (अर्शद) माझाही मुलगा आहे. त्याच्यासाठी खूप आनंदी आहे, त्याने खूप मेहनत केली.”

हेही वाचा – नीरज चोप्रावर नजरा, पण भाव खाऊन गेला पाकिस्तानचा अर्शद नदीम, ऑलिम्पिक रेकॉर्ड उद्ध्वस्त!

पाकिस्तानच्या अर्शद नदीमने ऑलिम्पिकमध्ये नवीन विक्रमासह सुवर्णपदक जिंकले आहे. नदीमने 92.97 मीटरचा दुसरा थ्रो केला. जो ऑलिम्पिक इतिहासातील सर्वात लांब थ्रो होता. त्याची सर्वात मोठी आवड क्रिकेटची होती. त्याने जिल्हास्तरावर अनेक क्रिकेट सामने खेळले पण भालाफेक खेळ त्याच्या नशिबात लिहिला होता. भालाफेकमध्ये सहभागी होण्यापूर्वी अर्शदने शॉट पुट आणि डिस्कस थ्रोमध्येही भाग घेतला होता.

व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment