जिंकलंस मित्रा..! जेव्हा ‘गोल्डन बॉय’ नीरज चोप्रा आपल्याच चाहत्याच्या पाया पडतो; पाहा VIDEO!

WhatsApp Group

मुंबई : टोक्यो ऑलिम्पिमध्ये भालाफेकपटू नीरज चोप्रानं सुवर्णपदक जिंकलं आणि आख्ख्या देशाची मान अभिमानानं उंचावली. लोक आयुष्यभर लक्षात ठेवतील, अशी कामगिरी केल्यानंतरही नीरजला कोणताही गर्व चढलेला नाही. गोल्डन बॉयचं बिरुद कमावलेल्या नीरजनं तसं वेळोवेळी सिद्धही केलंय. ऑलिम्पिकनंतरचे त्याचे इंटरव्ह्यू पाहिले, तरीही तुम्हाला तो किती जमिनीवर आहे, हे कळून येईल. सुंदर, देखणा असलेला नीरज ऑलिम्पिकनंतर अनेक जाहिरातींमध्ये दिसून आला. यावरून त्याचे इतर गुणही लोकांना कळले. पालकांनी आपल्या मुलांना नीरजचा आदर्श घ्या, असं सांगितल्याचं अनेकांनी ऐकलं असेल. नीरज दिवसेंदिवस लोकप्रिय होत आहे. खेळासोबतच त्याची इतरांशी वागणूक आणि त्याचा साधेपणाही चाहत्यांच्या पसंतीस उतरलाय.

स्वत:च्या भाषेवरचं प्रेम असो, वा देशाच्या ध्वजाप्रती आदराची भावना असो, नीरज प्रत्येक वेळी आपल्या सवयींनी चाहत्यांची मनं जिंकतो. पुन्हा एकदा नीरज चर्चेचा विषय ठरतोय. त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये नीरज एका वृद्ध चाहत्याच्या पायाला स्पर्श करत आशिर्वाद घेताना दिसत आहे, हा व्हिडिओ पाहून तुम्हीही नीरजचे फॅन व्हाल.

कुठला आहे हा VIDEO?

व्हायरल व्हिडिओमध्ये नीरज चोप्रा त्याच्या काही चाहत्यांशी बोलतो आणि त्यांच्यासोबत फोटो काढतो. यानंतर तो माझी बस आलीय, असं त्यांना आदरपूर्वक सांगतो. निरोप घेताना तो वृद्ध चाहत्याच्या पायाला स्पर्श करतो. नीरजचा हा व्हायरल झालेला व्हिडिओ स्कॉटहोमचा असून तो भालाफेक स्पर्धेत भाग घेण्यासाठी गेला होता. त्यानं स्वतःचाच विक्रम मोडला असून स्वीडनमधील डायमंड लीगमध्ये रौप्यपदक जिंकलं. यंदा तो ९० मीटर अंतरावर भालाफेक करण्याचा विक्रम नक्कीच गाठेल, असा त्याला विश्वास आहे.

नीरज मोडतोय रेकॉर्डवर रेकॉर्ड!

नीरज चोप्रा सध्या चांगल्या फॉर्मात असून गेल्या काही आठवड्यांत त्यानं दोनदा स्वतःचा राष्ट्रीय विक्रम मोडला आहे. भालाफेकमध्ये ९० मीटर अंतर गाठणं ही एक मोठी उपलब्धी मानली जाते आणि सध्या फक्त मोजकेच खेळाडू, अशी कामगिरी करू शकतायत. नीरजनं टोक्यो ऑलिम्पिक २०२० मध्ये सुवर्णपदक जिंकलं. यासोबत अॅथलेटिक्समध्ये मेडल पटकावणारा तो पहिला भारतीय ठरला. वैयक्तिक सुवर्णपदक जिंकणारा नीरज हा भारताचा दुसरा खेळाडू ठरलाय. नीरजच्या आधी अभिनव बिंद्रानं १३ वर्षांपूर्वी बीजिंग ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकलं होतं.

Leave a comment