नीरज चोप्राचं ‘ब्रम्हास्त्र’ झालं अमर..! ऑलिम्पिक गोल्ड जिंकलेला ‘भाला’ कुठं जाणार? वाचा इथं!

WhatsApp Group

Neeraj Chopras Javelin To Olympic Museum : भारताचा ‘गोल्डन बॉय’ नीरज चोप्रानं टोक्यो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक विजेता भाला स्वित्झर्लंडच्या लुसाने ऑलिम्पिक संग्रहालयाला भेट दिला. गेल्या वर्षी टोक्यो ऑलिम्पिकमध्ये ट्रॅक आणि फील्ड स्पर्धेत पदक जिंकणारा नीरज हा पहिला भारतीय खेळाडू ठरला. त्यानं शनिवारी संग्रहालयाला आपला सर्वात मौल्यवान भाला भेट दिला. भालाफेक स्पर्धेत त्यानं ८७.५८ मीटर अंतर पार करून ही ऐतिहासिक कामगिरी केली होती.

नीरज म्हणाला, “कोणत्याही खेळाडूसाठी इतरांना प्रेरणा मिळणं हा मोठा सन्मान असतो.” या संग्रहालयात अभिनव बिंद्राच्या सुवर्णपदक विजेत्या रायफलचाही समावेश आहे. २००८ मध्ये वैयक्तिक ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकणारा बिंद्रा हा पहिला भारतीय खेळाडू ठरला. ऑलिम्पिक वारसा जतन करण्याच्या उद्देशानं स्थापन करण्यात आलेलं हे संग्रहालय आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या हेरिटेज टीमद्वारे व्यवस्थापित केलं जातं.

हेही वाचा – IND Vs PAK Asia Cup 2022 : भाई, असा कॉन्फिडन्स हवा..! SIX मारण्यापूर्वी हार्दिकनं काय केलं? पाहा VIDEO

नीरज म्हणाला, “मला संग्रहालयात अभिनव बिंद्राची रायफल पाहायला मिळते, जी मला खूप प्रेरणा देते. मला आशा आहे की माझ्या भाल्याचा भविष्यातील खेळाडूंवर विशेषत: भारतातील खेळाडूंवर प्रभाव पडेल.” आयओसी अॅथलीट्स कमिशनचा सदस्य बिंद्रा हा देखील यावेळी उपस्थित होता. यावेळी बिंद्रा म्हणाला, “आतापर्यंत भारतीयांमध्ये माझी रायफल एकमेव होती. आता भाला माझ्या रायफलसोबत ऑलिम्पिक संग्रहालयात जोडला जाईल याचा मला आनंद आहे. ऑलिम्पिक संग्रहालयात ९०,००० हून अधिक कलाकृती ६,५०,००० फोटो, ४५,००० तासांचे व्हिडिओ या ऐतिहासिक नोंदी ठेवण्यात आल्या आहेत.

नीरजला डायमंड लीगचं विजेतेपद

नीरजनं पुन्हा एकदा इतिहास रचला. तो लुसाने डायमंड लीग २०२२ (Diamond League 2022) स्पर्धेचं विजेतेपद पटकावणारा पहिला भारतीय ठरला. २४ वर्षीय नीरजनं हे विजेतेपद मिळवण्याच्या पहिल्याच प्रयत्नात ८९.०८ मीटर अंतरावर भाला फेकला. त्याच्या कारकिर्दीतील हा तिसरा सर्वोत्तम प्रयत्न आहे. या कामगिरीनंतर नीरजनं ज्युरिख येथे ७ आणि ८ सप्टेंबर रोजी होणाऱ्या डायमंड लीगच्या फायनलमध्येही प्रवेश केला आहे. गेल्या महिन्यात झालेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेतून नीरज चोप्रानं माघार घेतली. नीरजला पाठदुखीचा त्रास होता. मात्र मैदानावर दमदार कमबॅक करताना त्यानं इतिहास रचला आहे.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment