मुंबई इंडियन्सचा ‘स्टार’ खेळाडू IPL 2024 मधून बाहेर, ‘या’ जबरदस्त खेळाडूला घेतलं!

WhatsApp Group

IPL 2024 सुरू होण्याच्या अवघ्या तीन दिवस आधी मुंबई इंडियन्सला मोठा धक्का बसला आहे. मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज जेसन बेहरेनडॉर्फ दुखापतीमुळे इंडियन प्रीमियर लीगमधून बाहेर गेला आहे. डावखुरा वेगवान गोलंदाज जेसन बेहरेनडॉर्फकडे नव्या चेंडूवर विकेट घेण्यात तरबेज आहे. आयपीएलच्या गेल्या मोसमात त्याने 12 सामन्यात 14 विकेट घेतल्या होत्या.

ऑस्ट्रेलियाच्या जेसन बेहरेनडॉर्फची ​​दुखापत हा मुंबई इंडियन्ससाठी २४ तासांत दुसरा धक्का आहे. श्रीलंकेचा दिलशान मधुशंका एक दिवस आधी दुखापतग्रस्त झाला होता. दिलशान मधुशंकाच्या फिटनेस अहवालात असे म्हटले आहे की तो पुढील काही दिवस सामना खेळू शकत नाही. म्हणजेच सुरुवातीच्या सामन्यांमध्ये तो मुंबई इंडियन्ससोबत दिसणार नाही.

मुंबई इंडियन्सने जेसन बेहरनडॉर्फच्या जागी इंग्लंडच्या ल्यूक वुडचा आपल्या संघात समावेश केला आहे. ल्यूक वुड, ऑस्ट्रेलियाच्या बेहरनडॉर्फसारखा डावखुरा वेगवान गोलंदाज आहे. ल्यूक वुडला आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळण्यासाठी 50 लाख रुपये मूळ किंमत मिळेल.

हेही वाचा – पीएसएलमध्ये सिगारेट ओढताना दिसला पाकिस्तानी क्रिकेटर, कॅमेऱ्यात घटना कैद, पाहा VIDEO

28 वर्षीय ल्यूक वुडने आतापर्यंत इंग्लंडकडून दोन वनडे आणि 5 टी-20 सामने खेळले आहेत. या 5 टी-20 सामन्यात त्याने 8 विकेट घेतल्या आहेत. ल्यूक वुडने बिग बॅश लीग, पीएसएलसारख्या टी-20 लीग क्रिकेटमध्ये खूप यश मिळवले आहे. त्याने 140 टी-20 सामन्यात 147 विकेट घेतल्या आहेत.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment