पृथ्वी शॉ स्वतःचा शत्रू आहे, रात्रभर बाहेर राहायचा, सकाळी 6 वाजता परत यायचा…

WhatsApp Group

Prithvi Shaw : मुंबईने आगामी विजय हजारे ट्रॉफी हंगामासाठी आपला संघ जाहीर केला, ज्यामध्ये स्टार फलंदाज पृथ्वी शॉला स्थान मिळाले नाही. अलीकडेच सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी जिंकणाऱ्या मुंबई संघाचा पृथ्वी शॉ भाग होता. विजय हजारे ट्रॉफीमध्ये संघाबाहेर झाल्यानंतर शॉने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून संताप व्यक्त केला होता, त्यानंतर आता एमसीएकडून एक वक्तव्य आले आहे.

मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) पृथ्वी शॉला विजय हजारे ट्रॉफी संघातून वगळल्याबद्दल म्हटले की तो सतत शिस्त मोडत आहे आणि तो स्वतःचा शत्रू आहे. एमसीएच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले की, खराब फिटनेस, वृत्ती आणि शिस्तीच्या मुद्द्यांमुळे संघाला कधीकधी त्याला मैदानात लपवावे लागले. 16 सदस्यीय विजय हजारे ट्रॉफी संघात स्थान न मिळाल्याने शॉने सोशल मीडिया पोस्टद्वारे संताप व्यक्त केला होता.

हेही वाचा – विराट कोहली, अनुष्का शर्मा भारत सोडून लंडनला शिफ्ट का होतील? काय कारण?

या अधिकाऱ्याने सांगितले की, ‘सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये आम्ही दहा क्षेत्ररक्षकांसह खेळत होतो कारण शॉला लपवावे लागले. चेंडू त्याच्या जवळून जात होता आणि तो पकडू शकत नव्हता. फलंदाजी करतानाही त्याला चेंडूपर्यंत पोहोचण्यात अडचण येत होती. त्याचा फिटनेस, शिस्त आणि वृत्ती वाईट आहे आणि वेगवेगळ्या खेळाडूंसाठी वेगळे नियम असू शकत नाहीत. संघातील वरिष्ठ खेळाडूही त्याच्या या वृत्तीबद्दल तक्रारी करू लागले. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी दरम्यान, शॉ नियमितपणे सराव सत्र चुकवत असे आणि रात्रभर बाहेर राहिल्यानंतर सकाळी सहा वाजता टीम हॉटेलमध्ये पोहोचायचा. मैदानाबाहेरील कामांमुळे चर्चेत असलेला शॉ आपल्या प्रतिभेला न्याय देत नाही. अशा सोशल मीडिया पोस्ट्समुळे त्याला काहीही फायदा होणार नाही.’ याआधी ऑक्टोबरमध्येही याच कारणांमुळे शॉला मुंबईच्या रणजी संघातून वगळण्यात आले होते.

शॉचा सहकारी आणि मुंबईचा कर्णधार श्रेयस अय्यरनेही या विषयावर बोलून सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये मुंबईच्या विजयानंतर स्पष्ट सल्ला दिला. अय्यर म्हणाला, ‘त्याला त्याच्या कामाच्या पद्धती सुधाराव्या लागतील. जर त्याने हे केले तर आकाश त्याच्यासाठी ठेंगणे आहे. आम्ही कोणाचीही काळजी घेऊ शकत नाही. शेवटी, गोष्टी समजून घेणे ही त्याची जबाबदारी आहे.’

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment