Video : सरफराज खानचा हाहाकार..! मराठमोळा कोचही झाला खुश; शतक केल्यानंतर काय घडलं बघा!

WhatsApp Group

Amol Muzumdar On Sarfaraz Khan Hundred : युवा फलंदाज सरफराज खान देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करत आहे. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या रणजी ट्रॉफी (Ranji Trophy) सामन्यात सरफराजने सोमवारी आणखी एक शतक ठोकले. सरफराज एकापाठोपाठ एक शतके झळकावत आहे मात्र असे असतानाही त्याला राष्ट्रीय संघात खेळण्याची संधी दिली जात नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्ध नुकत्याच जाहीर झालेल्या पहिल्या दोन कसोटी संघात सरफराजला संधी देण्यात आलेली नाही.

सरफराजने मागील २३ रणजी सामन्यांमध्ये १० शतके झळकावली आहेत. अशा स्थितीत भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी खेळाडू आणखी काय करू शकतो याचे सर्वांनाच आश्चर्य वाटते. यावेळी अरुण जेटली स्टेडियमचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये मुंबईचे प्रशिक्षक अमोल मुझुमदार यांनी या शतकानंतर सरफराजला विशेष सन्मान दिला. या शतकावर मुझुमदार यांनी आपली टोपी काढून सरफराज खानचा विशेष सन्मान केला.

हेही वाचा – Fact Check : आधार कार्ड असल्यास तुम्हाला मिळेल ४.७८ लाखांचं लोन? जाणून घ्या खरं!

या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर मुंबई संघाने अवघ्या ६६ धावांत आपले चार विकेट गमावल्या होत्या. सर्फराज पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला तेव्हा मुंबई संघ संकटात सापडला होता. कर्णधार अजिंक्य रहाणे अवघ्या दोन धावा करून बाद झाला. सलामीचा फलंदाज पृथ्वी शॉने ४० धावांची खेळी खेळली पण त्याला इतर फलंदाजांची फारशी साथ मिळाली नाही.

सरफराजने शम्स मुलाणीसोबत सहाव्या विकेटसाठी १४४ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. ज्याच्या मदतीने मुंबईची धावसंख्या २५० च्या पुढे जाऊ शकली. सरफराजने या सामन्यात १६ चौकार आणि चार षटकार मारले. यादरम्यान त्याच्या बॅटमधून १५५ चेंडूत ८० पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने १२५ धावा आल्या. सरफराजच्या शतकाच्या जोरावर मुंबईचा संघ पहिल्या डावात २९३ धावांवर आटोपला.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment