महेंद्रसिंह धोनीची पोस्ट व्हायरल! भारताने टी-20 वर्ल्डकप जिंकताच म्हणाला, “माझ्या हृदयाचे ठोके…”

WhatsApp Group

MS Dhoni On Team India : भारतीय संघाने टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शेवटच्या चेंडूवर रोमहर्षक विजय मिळवून इतिहास रचला. या स्पर्धेत एकही सामना न गमावता जेतेपदावर कब्जा करणारा टीम इंडिया पहिला संघ ठरला आहे. टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना विराट कोहलीचे अर्धशतक आणि अक्षर पटेलच्या 47 धावांच्या जोरावर 7 गडी गमावून 176 धावा केल्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा संघ 8 गड्यांच्या मोबदल्यात 169 धावाच करू शकला.

भारताला पहिल्यांदा टी-20 चॅम्पियन बनवणाऱ्या महेंद्रसिंह धोनीनेही रोहित ब्रिगेडचे कौतुक केले आहे. धोनीने इन्स्टाग्रामवर म्हटले, ”वर्ल्डकप चॅम्पियन्स 2024. माझ्या हृदयाचे ठोके वाढले होते. संयम पाळल्याबद्दल, आत्मविश्वास ठेवल्याबद्दल तुमचं खूप कौतुक. वर्ल्डकप घरी आणल्याबद्दल सर्व भारतीयांकडून आभार. अरे वाढदिवसाच्या अनमोल भेटीसाठी धन्यवाद.”

हेही वाचा – मुमेंट है भाई..! विराटनं धरला हट्ट आणि राहुल द्रविडचं ‘धिंगाणा’ सेलिब्रेशन, पाहा Video

टी-20 वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघाने 2007 पासून सुरू असलेला ट्रॉफीचा दुष्काळ संपवला. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नाणेफेक जिंकल्यानंतर कर्णधार रोहित शर्माने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीच्या तीन धक्क्यांनंतर विराट कोहलीने अक्षर पटेलसह संघाला संकटातून सोडवले. कोहलीने 59 चेंडूत 6 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 76 धावांची मौल्यवान खेळी केली. अक्षर पटेलने 31 चेंडूत 47 धावा केल्या. भारताने 7 गड्यांच्या मोबदल्यात 176 धावा केल्या.

लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची सुरुवात चांगली झाली नाही. जसप्रीत बुमराहने रीझा हेंड्रिक्सला क्लीन बोल्ड करून पहिली विकेट मिळवली. यानंतर अर्शदीप सिंगने कर्णधार एडन मार्करामला ऋषभ पंतकडे विकेटच्या मागे झेलबाद केले. हेनरिक क्लासेनने झंझावाती अर्धशतक झळकावले आणि 15व्या षटकात अक्षर पटेलच्या षटकात 24 धावा केल्या. इथून सामना फिरला आणि भारत हरेल असे वाटत होते. जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्याने विकेट घेत कमबॅक केले आणि शेवटच्या चेंडूवर सामना भारताच्या बाजूने गेला.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment