MS Dhoni : चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी पुन्हा एकदा इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्रॉफी जिंकून चर्चेत आला आहे. या बातम्यांमध्ये एक बातमी अशीही आली होती की धोनी आयपीएलसह क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घेणार आहे. तसे, धोनीने या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही, पण त्याने तसे केले तरी त्याच्या कमाईवर फारसा परिणाम होणार नाही. धोनी इतका मोठा ब्रँड बनला आहे की त्याच्याकडे पैसे स्वतःच येतात. आपण येथे धोनीबद्दल कमी आणि त्याच्या एका कंपनीच्या सीईओबद्दल अधिक बोलणार आहोत.
सासू सांभाळते कंपनी
शीला सिंह या धोनीच्या प्रोडक्शन हाऊस ‘धोनी एंटरटेनमेंट लिमिटेड’च्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आहेत. ही कंपनी करोडोंचा व्यवसाय करते. विशेष म्हणजे शीला सिंह ही साक्षी सिंहची आई म्हणजेच धोनीची सासू आहे. एवढेच नाही तर या कंपनीत आणखी एक सीईओ असून धोनीची पत्नी साक्षी ही जबाबदारी सांभाळत आहे.
खरं तर, जेव्हा आपल्या व्यवसायाच्या साम्राज्याचा विस्तार करण्याचा विचार आला तेव्हा धोनीने कुटुंबातील सदस्यांवर अधिक विश्वास दाखवला आणि आपल्या सासूवर एक मोठी जबाबदारी सोपवली. त्या 2020 पासून कंपनीच्या प्रमुख आहे.
Meet #SheilaSingh, #MSDhoni's CEO mother-in-law who runs Rs 800 crore firm
READ here!https://t.co/RpXT3YrNiQ
— DNA (@dna) June 14, 2023
हेही वाचा – Video : आर्रर्र हे काय! एका बॉलमध्ये दिले 18 रन्स; भारतीय क्रिकेटर चर्चेत
कंपनी नवीन उंचीवर
शीला सिंह पहिल्यांदाच एखाद्या कंपनीचे नेतृत्व करत आहेत असे म्हणायला हवे, पण त्यांनी आपल्या मुलीसोबत ‘धोनी एंटरटेनमेंट लिमिटेड’ला नव्या उंचीवर नेले आहे. एका रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की, आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात शीला सिंह यांचे पती आरके सिंह हे धोनीचे वडील पान सिंह धोनी यांच्यासोबत कनोई ग्रुपच्या ‘बिनागुरी टी कंपनी’मध्ये काम करायचे. त्यावेळी शीला सिंह गृहिणी होत्या.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, शीला सिंह आणि साक्षी धोनीच्या नेतृत्वाखाली धोनी एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडची एकूण संपत्ती 800 कोटींहून अधिक झाली आहे. साक्षी धोनी सध्या धोनीच्या प्रोडक्शन हाऊसची सर्वात मोठी शेअरहोल्डर आहे. धोनी एंटरटेनमेंट ही टीम इंडियाचा माजी कर्णधार धोनीने स्थापन केलेल्या अनेक कंपन्या आणि व्यावसायिक उपक्रमांपैकी एक आहे. त्यामुळे त्यांची संपत्ती 1030 कोटींवर पोहोचली आहे. धोनी अनेक कंपन्यांच्या जाहिराती करतो. याशिवाय, त्याने अनेक कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे, ज्यामुळे तो दरवर्षी भरपूर कमाई करतो.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!