MS Dhoni : भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या फोटोत तो श्री भगवद्गीतेसोबत कारमध्ये दिसत आहे. हा फोटो मुफद्दल वोहरा नावाच्या व्यक्तीने शेअर केला आहे. व्हायरल झालेल्या फोटोमध्ये धोनी गीता हातात घेऊन हसताना दिसत आहे. दरम्यान, त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळाच तेज दिसून येतो.
कोकिळाबेन रुग्णालयात धोनीची शस्त्रक्रिया
आयपीएलदरम्यान धोनी अनेकदा वेदनेने व्हिवळताना दिसला. स्पर्धा संपताच त्याने पुढील 48 तासांत डॉक्टरांशी संपर्क साधला. त्यानंतर मिळालेल्या सल्ल्यानुसार त्याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. आर्थिक राजधानी मुंबईतील कोकिळाबेन रुग्णालयात गुडघ्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
हेही वाचा – मोदी ‘असं’ बोलले अन् डोळ्यात पाणीच आलं! म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांनी….”
MS Dhoni reading the Bhagavad Gita. pic.twitter.com/lla0rtWWkX
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) June 1, 2023
दिनशॉ पार्डीवाला यांनी केली धोनीची शस्त्रक्रिया
धोनीची शस्त्रक्रिया आर्थ्रोस्कोपी विभागाचे संचालक दिनशॉ पार्डीवाला यांनी केली. धोनीपूर्वी त्याने नुकताच कार अपघातात जखमी झालेल्या ऋषभ पंत या युवा खेळाडूवरही उपचार केले होते. आपल्या 23 वर्षांच्या अनुभवात पार्डीवाला यांनी क्रिकेटपटूंवर तसेच इतर अनेक नामवंत खेळाडूंवर शस्त्रक्रिया केल्या आहेत.
धोनी आयपीएल 2024 मध्ये सहभागी होणार का?
आयपीएल 2023 नंतर धोनी येथून निवृत्त होईल अशी अपेक्षा होती, परंतु तसे झाले नाही. माहीने अद्याप प्रतिष्ठेच्या लीगमधून निवृत्ती जाहीर केलेली नाही. यामुळे चाहत्यांमध्ये आशा निर्माण झाली आहे की पुढील वर्षीही धोनी मैदानात दिसणार आहे.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!