IPL 2023 : विराट कोहली, रोहित शर्मा आणि महेंद्रसिंह धोनी आयपीएल 2023 मध्ये चांगले खेळत आहेत. पण, IPL 2023 स्पर्धेदरम्यानच्या मध्यरात्री या तीन क्रिकेटपटूंना धक्का बसला. क्रिकेटचा देव म्हटला जाणारा सचिन तेंडुलकरही या धक्क्यातून सुटलेला नाही. रोहित, विराट आणि धोनीचे मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरवर करोडो फॉलोअर्स आहेत. असे असूनही, नवीन पॉलिसीनुसार, या खेळाडूंच्या अकाऊंटवरून व्हेरिफाईड ब्लू टिक काढून टाकण्यात आले आहे.
ट्विटरचे सीईओ एलोन मस्क यांनी यापूर्वीच याची घोषणा केली होती. त्यांनी सांगितले होते की, 20 एप्रिलनंतर ज्या लोकांनी सशुल्क सबस्क्रिप्शन घेतले नाही अशा लोकांच्या अकाऊंटमधून व्हेरिफाईड ब्लू टिक काढून टाकले जाईल. आता तुम्हाला ट्विटरवर ब्लू टिक हवी असेल, तर त्यासाठी तुम्हाला दर महिन्याला ठराविक किंमत मोजावी लागेल. गुरुवारी मध्यरात्रीपासून नवीन धोरण लागू करण्यात आले. तो लागू होताच, मध्यरात्रीपासून स्टार क्रिकेटर्स, राजकारणी आणि अनेक बॉलीवूड स्टार्सच्या ट्विटर अकाऊंटवरून ब्लू टिक हटवण्यात आली.
MS Dhoni, Virat Kohli, Rohit Sharma & Sachin Tendulkar have lost their legacy blue check mark on Twitter pic.twitter.com/gyJUYCIktN
— All About Cricket (@allaboutcric_) April 21, 2023
हेही वाचा – Horoscope Today : ग्रहांचे शुभ योग, पहा मेष ते मीन राशीच्या सर्व राशींसाठी शुक्रवार कसा राहील
विराट कोहलीचे ट्विटरवर 55.1 मिलियन (5 कोटींहून अधिक) फॉलोअर्स आहेत. रोहित शर्माचे 21.7 मिलियन आणि धोनीचे 8.5 मिलियन फॉलोअर्स आहेत. तर सचिन तेंडुलकरचे 38.6 मिलियन फॉलोअर्स आहेत. असे असूनही, गुरुवारी मध्यरात्रीपासून भारतीय क्रिकेटमधील या दिग्गजांच्या अकाऊंटमधून ब्लू टिक्स काढण्यात आल्या.
ब्लू टिकसाठी द्यावे लागतील पैसे!
ट्विटर ब्लू सब्सक्रिप्शनची सुविधा काही काळापूर्वी भारतात सुरू करण्यात आली आहे. जर तुम्हाला ही सुविधा भारतात मोबाईलवर घ्यायची असेल, तर 900 रुपये आणि वेब व्हर्जनसाठी 650 रुपये मासिक सब्सक्रिप्शन निश्चित करण्यात आली आहे. त्याच वेळी, वापरकर्ते प्रीमियर सेवेची सदस्यता देखील घेऊ शकतात. यासाठी वर्षाला 6800 रुपये मोजावे लागणार आहेत. म्हणजे दरमहा 565 रुपये.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!