MS Dhoni petition against IPS officer Sampath Kumar : अनुभवी क्रिकेटपटू आणि टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने एका आयपीएस अधिकाऱ्याविरोधात मद्रास उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. हे प्रकरण न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करण्याशी संबंधित आहे. याप्रकरणी धोनीने आयपीएस संपत कुमार यांच्याविरोधात याचिका दाखल केली आहे. शुक्रवारीच सुनावणी होणार होती, मात्र वेळेअभावी ती होऊ शकली नाही. आता या प्रकरणावर मंगळवारी सुनावणी होणार आहे. जाणून घेऊया कोणत्या प्रकरणात कॅप्टन कूलने आयपीएस विरोधात याचिका दाखल केली आहे.
नक्की प्रकरण काय?
हे प्रकरण २०१३ इंडियन प्रीमियर लीग (IPL) मधील स्पॉट-फिक्सिंग आणि सट्टेबाजीशी संबंधित आहे. या प्रकरणाचा तपास आयपीएस संपत कुमार यांनी केला होता. याप्रकरणी आयपीएस अधिकारी संपत कुमार यांनी धोनीविरोधात टिप्पणी केली होती. २०१३ च्या आयपीएल सामन्यांमध्ये धोनी बेटिंग आणि स्पॉट फिक्सिंगमध्ये सामील होता, असे त्याने म्हटले होते. आपल्या या वक्तृत्वानंतर धोनीने मद्रास उच्च न्यायालयात धाव घेतली होती आणि संपतचे वक्तृत्व थांबवण्याबरोबरच मानहानीचा खटलाही दाखल केला होता. एका खासगी वाहिनीवर त्यांनी मानहानीचा खटलाही दाखल केला होता.
हेही वाचा – IPL 2023 Mini Auction : बेन स्टोक्ससह ‘हे’ ३ स्टार खेळाडू उतरणार लिलावात..! वाचा कोण आहेत ते
MS Dhoni moves Madras HC seeking criminal contempt proceedings against IPS officer Sampath Kumar
Read @ANI Story | https://t.co/Gd0nXLPd0W#MSDhoni #MadrasHighCourt #IndianCricketer #IPL pic.twitter.com/e25PLN4HnY
— ANI Digital (@ani_digital) November 5, 2022
धोनीच्या जुन्या याचिकेनंतर, न्यायालयाने संपत आणि इतर पक्षांना धोनीविरुद्ध कोणतीही बदनामीकारक विधाने करण्यापासून रोखत अंतरिम मनाई आदेश दिला होता. यानंतर डिसेंबर २०२१ मध्ये संपत यांनी लेखी अर्ज करून मानहानीचा खटला रद्द करण्याची विनंती केली. कमेंटमध्ये त्यांनी म्हटले होते की, अशा सूटद्वारे लोक त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत.
आता संपत यांच्या त्या अर्जाच्या आधारे धोनीने त्याच्यावर अवमानाचा खटला दाखल केला आहे. धोनीने याचिकेत म्हटले आहे की, आयपीएस अधिकाऱ्याने आपल्या लेखी प्रतिक्रियेत अशी टिप्पणी केली आहे, ज्यामुळे त्याच्या सन्मानाला धक्का बसतो. न्यायालयाच्या आदेशाचा अवमान मानण्याची विनंती त्यांनी केली आहे.