MS Dhoni On Winning World Cup 2023 In Marathi : सध्या सुरू असलेल्या वर्ल्डकप 2023 मध्ये रोहित शर्मााच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय संघाने जबरदस्त कामगिरी केली आहे. भारताने आत्तापर्यंत पाचही सामने जिंकले आहेत. भारताने ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान आणि न्यूझीलंडसारख्या मोठ्या संघांना पराभूत केले आहे. टीम इंडियाने शेवटचा वर्ल्डकप 2011 मध्ये आणि 2013 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. पण यावेळी टीम इंडियाची कामगिरी पाहता ती प्रबळ दावेदार मानली जात आहे.
भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने टीम इंडियाच्या कामगिरीबद्दल मोठी गोष्ट सांगितली आहे. रविवारी 29 ऑक्टोबर रोजी संघाचा सहावा सामना इंग्लंडशी होणार आहे. हा सामना लखनऊमध्ये होणार आहे. धोनीने एनडीटीव्हीला एका कार्यक्रमादरम्यान सांगितले की, ही एक उत्तम टीम आहे. संघाचा समतोल चांगला आहे. प्रत्येकजण चांगला खेळत आहे. या परिस्थितीत सर्वकाही चांगले दिसत आहे.
संघाच्या विजयाच्या शक्यतेवर धोनी म्हणाला की, मी यापेक्षा जास्त काही बोलणार नाही. शहाण्या माणसाला इशारा पुरेसा असतो. अशा परिस्थितीत संघ पुन्हा एकदा 2011 च्या पराक्रमाची पुनरावृत्ती करू शकतो, याचा अंदाज माहीच्या बोलण्यातून लावता येतो. मायदेशात झालेल्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेचा पराभव करून विजेतेपद पटकावले होते.
हेही वाचा – IPL 2024 ऑक्शन संदर्भात ‘मोठी’ बातमी! कधी, कुठे होणार? जाणून घ्या
धोनीचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना 2019 च्या विश्वचषकातील उपांत्य सामना होता. यात न्यूझीलंडने भारतीय संघाचा पराभव केला. यानंतर माहीने 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. धोनी अजूनही आयपीएलमध्ये खेळत आहे. त्याच्या नेतृत्वाखाली, त्याने चेन्नई सुपर किंग्जला आयपीएल 2023 चे विजेतेपद जिंकले. चेन्नईचे हे पाचवे आयपीएल विजेतेपद आहे.
रोहित शर्मा प्रथमच एकदिवसीय विश्वचषकात संघाचे नेतृत्व करत आहे. अशा स्थितीत त्याला संघाला विजय मिळवून द्यायला नकक्कीच आवडेल. त्यांच्या वयाचा विचार करता रोहित आणि विराट कोहलीचा हा शेवटचा विश्वचषक ठरू शकतो. नुकतेच या संघाने आशियाई चषक 2023 चे विजेतेपदही पटकावले आहे.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!