MS Dhoni : रिटायरमेंटचा विषय सोडा, महेंद्रसिंह धोनी जाणार लंडनला, कारण….

WhatsApp Group

MS Dhoni : भारत आणि चेन्नई सुपर किंग्जचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी उपचारासाठी लंडनला जाण्याचा विचार करत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, धोनी दुखापतीतून सावरल्यानंतर आयपीएलमधील आपल्या भविष्याबद्दल निर्णय घेईल. करो किंवा मरोच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) विरुद्ध पराभव पत्करावा लागल्यानंतर सीएसके प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडली.

पाचवेळा चॅम्पियन आयपीएल प्लेऑफमध्ये न पोहोचण्याची ही केवळ तिसरी वेळ आहे. एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर गतविजेत्या सीएसकेला 27 धावांनी पराभव पत्करावा लागला. यात धोनी 13 चेंडूत 25 धावा करून मैदानातून बाहेर पडला, तेव्हा त्याच्या भविष्याविषयीच्या अटकळांना जोर आला. मात्र, लंडनमध्ये शस्त्रक्रियेनंतरच धोनी निवृत्तीचा निर्णय घेईल, असे अलीकडील अहवालातून समोर आले आहे.

हेही वाचा – Drinking Hot Water In Summer : उन्हाळ्यात गरम पाणी पिणे चांगले की वाईट?

रिपोर्ट्सनुसार, ”धोनी स्नायूंच्या दुखण्यावर शस्त्रक्रियेसाठी लंडनला जाऊ शकतो. आयपीएल 2024 मध्ये त्याला स्नायू दुखण्याचा त्रास सहन करावा लागला होता. तो पूर्णपणे तंदुरुस्त नाही पण त्याला क्रिकेट खेळायचे आहे आणि उपचारानंतरच तो त्याच्या भविष्याचा निर्णय घेईल. त्याला बरे होण्यासाठी पाच ते सहा महिने लागतील. मेगा ऑक्शनही सहा-सात महिन्यांनी होणार आहे. या वर्षी डिसेंबरच्या अखेरीस पुढील वर्षीच्या आयपीएलसाठी एक मेगा लिलाव होऊ शकतो, ज्यामध्ये सध्याच्या नियमांनुसार, एका संघाला फक्त चार खेळाडूंना कायम ठेवण्याची परवानगी आहे.

आयपीएल 2024 च्या साखळी फेरीतील 68 व्या सामन्यात 219 धावांचे आव्हान असताना चेन्नईचा संघ 20 षटकात 7 गडी गमावून 191 धावाच करू शकला. साखळी फेरीत RCB आणि चेन्नईचे प्रत्येकी 14 गुण होते, पण चेन्नईपेक्षा चांगल्या नेट रन-रेटमुळे RCB प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवण्यात यशस्वी झाला. सीएसकेने त्यांची आयपीएल मोहीम संपवल्यामुळे, चाहत्यांनी आणि तज्ञांनी असा अंदाज बांधला होता की हा धोनीचा शेवटचा हंगाम असू शकतो. मात्र, या अटकळांच्या दरम्यान धोनी रांची येथील त्याच्या घरी परतला आहे.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment