MS Dhoni : इंडियन प्रीमियर लीगच्या 16 व्या मोसमात चेन्नई सुपर किंग्जला चॅम्पियन बनवल्यानंतर महेंद्रसिंह धोनीच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. CSK सीईओ काशी विश्वनाथ यांनी कॅप्टनच्या शस्त्रक्रियेची चर्चा शेअर करताना अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. माहीवर मुंबईत शस्त्रक्रिया करण्यात आली, पण चाहत्यांना चिंता सतावत आहे की, त्यांच्या आवडत्या स्टारला रुग्णालयातून डिस्चार्ज कधी मिळणार, तो मुंबईत राहणार की रांचीला त्याच्या गावी जाणार?
इंडियन प्रीमियर लीग 2023 मध्ये, गुडघ्याच्या समस्येने त्रस्त असतानाही महेंद्रसिंह धोनीने सर्व सामने खेळले आणि संघाला 5व्यांदा स्पर्धेत चॅम्पियन बनवले. चेन्नई संघाने आयपीएल फायनलच्या राखीव दिवशी गुजरात टायटन्सविरुद्ध रोमहर्षक विजयाची नोंद केली. रवींद्र जडेजाने शेवटच्या दोन चेंडूंवर एक षटकार आणि एक चौकार मारून संघाला विजय मिळवून दिला. आयपीएल विजयानंतर महेंद्रसिंह धोनीच्या गुडघ्यावर मुंबईत शस्त्रक्रिया करण्यात आली आणि आता तो हळूहळू बरा होऊन लवकरात लवकर मैदानात परतण्यास इच्छुक आहे.
PTI शी बोलताना CSK CEO काशी विश्वनाथ यांनी धोनीच्या शस्त्रक्रियेबद्दल माहिती दिली, गुरुवारी ते म्हणाले, “धोनीच्या गुडघ्यावर कोकिळाबेन हॉस्पिटलमध्ये यशस्वीपणे शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. तो ठीक असून सकाळीच ऑपरेशन करण्यात आले. धोनीला पूर्णपणे तंदुरुस्त होण्यासाठी किमान दोन महिने लागू शकतात.”
हेही वाचा – Wrestlers Protest : “कष्टाने जिंकलेली पदके….”, वर्ल्डकप विजेत्या संघाकडून कुस्तीपटूंचं समर्थन!
कुठे आहे धोनी?
धोनीला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे, चेन्नई सुपर किंग्जच्या वतीने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगण्यात आले, चेन्नईचा कर्णधार मुंबईहून त्याच्या मूळ गावी रांचीला गेला आहे. शस्त्रक्रियेनंतर धोनी आता काही दिवस त्याच्या घरी राहणार आहे. पुनर्वसन सुरू होण्यापूर्वी तो काही दिवस घरी विश्रांती घेणार आहे.
धोनी आयपीएल 2024 मध्ये खेळताना दिसणार
इंडियन प्रीमियर लीगचा नुकताच हंगाम सुरू होण्यापूर्वी धोनीच्या निवृत्तीची बातमी जोरात होती. चेन्नई सुपर किंग्जला चॅम्पियन बनवून त्याने यासंबंधीच्या सर्व बातम्यांना पूर्णविराम दिला. टूर्नामेंटदरम्यानही धोनीने आग्रह धरला की इतर लोक हे त्याचे शेवटचे सीझन सांगत आहेत आणि त्याने स्वतः ते मान्य केले आहे. माझ्या शरीराने मला साथ दिली तर मी इंडियन प्रीमियर लीगच्या पुढील मोसमातही नक्कीच खेळेन, असे तो म्हणाला होता.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!