Video : धोनी-हार्दिकचा ‘कूल’ डान्स..! ‘काला चश्मा’ गाण्यावर केलं असं काही, की तुम्हीही बघत बसाल

WhatsApp Group

MS Dhoni Dancing Video : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी सध्या इंडियन प्रीमियर लीग २०२३ च्या तयारीत व्यस्त आहे. धोनीचा हा शेवटचा सीझन असेल, पण यादरम्यान धोनीची मस्ती सुरूच आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये धोनी टीम इंडियाचा स्टार ऑलराउंडर हार्दिक पंड्यासोबत डान्स करताना दिसत आहे.

धोनी आणि हार्दिक पंड्याचा हा व्हिडिओ दुबईचा असल्याचे सांगितले जात आहे, जो एका बर्थडे पार्टीचा आहे. येथे बॉलीवूड रॅपर बादशाह त्याच्या प्रसिद्ध ‘काला चष्मा’ गाण्यावर रॅप करताना दिसत आहे, ज्याच्यासोबत महेंद्रसिंह धोनी, हार्दिक पंड्या, कृणाल पंड्या आणि ईशान किशनसह इतर अनेकजण नाचत आहेत. हार्दिक पंड्या नुकतेच न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत कर्णधारपदावरून परतत आहे, जिथे त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने मालिका १-० ने जिंकली. हार्दिक अद्याप एकदिवसीय मालिकेचा भाग नसून दुबईत सुट्टी घालवत आहे.

हेही वाचा – Gold Silver Price : लग्नसराईत सोने-चांदी स्वस्त? आजचा दर किती? वाचा इथे!

या पार्टीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत, ज्यामध्ये महेंद्रसिंह धोनी, ईशान किशन, हार्दिक पंड्या आणि इतर खेळाडू डान्स करत आहेत. माजी कर्णधार धोनीची ही शैली चाहत्यांनी प्रथमच पाहिली आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करणारा महेंद्रसिंह धोनी आता आयपीएल २०२३ मध्ये चाहत्यांना दिसणार आहे. डिसेंबरमध्ये आयपीएल २०२३ साठी लिलाव आहे, तर आयपीएल मार्च-एप्रिलमध्ये होऊ शकते. महेंद्रसिंह धोनीची खेळाडू म्हणून ही शेवटची आयपीएल असू शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे. धोनीने आधीच सांगितले आहे की तो शेवटचा टी-२० सामना चेन्नईतच खेळणार आहे.

Leave a comment