MotoGP To Race In India : फॉर्म्युला वन शर्यत कॅलेंडरमधून वगळल्यानंतर नऊ वर्षांनंतर मोटोजीपी (MotoGP) ने शुक्रवारी भारतात २०२३ हंगामापासून शर्यतीची पुष्टी केली. मोटोजीपीने जारी केलेल्या संभाव्य कॅलेंडरमध्ये, भारतात होणाऱ्या कार्यक्रमाची तारीख २२ ते २४ सप्टेंबर अशी आहे. जगातील प्रमुख टू-व्हीलर रेसिंग चॅम्पियनशिप फॉर्म्युला वन प्रमाणे बुद्ध इंटरनॅशनल सर्किटवर होणार आहे. या सर्किटने २०११ ते २०१३ पर्यंत फॉर्म्युला वनचे आयोजन केले आहे.
MotoGP ने घोषणा केली की पुढील वर्षी मोटरसायकल ग्रँड प्रिक्स आयोजित करणारा भारत ३१ वा देश बनेल. त्याच्या तात्पुरत्या कॅलेंडरनुसार, भारत सप्टेंबरमध्ये २१-शर्यतींच्या हंगामात १४व्या फेरीचे आयोजन करेल. या शर्यतीला ‘ग्रँड प्रिक्स ऑफ इंडिया’ असे नाव देण्यात आले आहे. या महिन्याच्या सुरुवातीला, MotoGP चे व्यावसायिक हक्क धारक डोर्नाचे शीर्ष अधिकारी या महिन्याच्या सुरुवातीला भारतीय रेस प्रमोटर्स फेअरस्ट्रीट स्पोर्ट्स (FSS) सह ७ वर्षांच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यासाठी भारतात आले होते. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांचीही त्यांनी भेट घेतली.
हेही वाचा – पुजेदरम्यान चुळबुळ करणाऱ्या जय शाहंनी खाल्ला बापाचा ओरडा; Video होतोय व्हायरल!
India: a country with so much passion for motorcycles! 🏍️#MotoGP is ready to take on Buddh International Circuit in 2023! 😎#IndianGP 🇮🇳 pic.twitter.com/Tmf2SL9ndB
— MotoGP™🏁 (@MotoGP) September 30, 2022
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, “अशा जागतिक कार्यक्रमाचे आयोजन करणे उत्तर प्रदेशसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. आमचे सरकार MotoGP India ला पूर्ण सहकार्य करेल. असा मोठा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सरकारच्या पाठिंब्याची गरज आहे आणि या शर्यतीला राज्य आणि केंद्र सरकारचा पाठिंबा आहे.”
MotoGP बाइक रेसिंगसाठी जगभर प्रसिद्ध आहे. भारतातील लोकांनाही ते पाहायला आवडते. MotoGP दरवर्षी रेसिंगच्या अनेक स्पर्धा आयोजित करते. या स्पर्धेत जगभरातील अनेक रेसर्स सहभागी होतात. रेसिंग टूर्नामेंट्सने भारतात गेल्या काही वर्षांपासून स्वतःसाठी एक स्थान निर्माण केले आहे.