“टीम इंडियाच्या खेळाडूंना पैशाचा घमंड आणि….”, कपिल देव यांनी झापलं!

WhatsApp Group

Kapil Dev On Team India : 1983 चा विश्वचषक विजेता कर्णधार कपिल देव यांनी भारतीय क्रिकेट संघाबाबत मोठे वक्तव्य केले आहे. त्यांनी भारतीय खेळाडूंना फटकारले आहे. कपिल देव यांनी सर्वप्रथम भारतीय खेळाडूंच्या आत्मविश्वासाचे कौतुक केले. मात्र त्यानंतरच खेळाडू स्वत:ला सर्वज्ञ समजतात, त्यांना कोणाचा सल्ला घेण्याची गरज वाटत नाही, असेही ते म्हणाले. कपिल देव यांनी ‘द वीक’ला सांगितले की, प्रत्येकामध्ये मतभेद आहेत, परंतु या भारतीय खेळाडूंबद्दल एक चांगली गोष्ट म्हणजे त्यांच्यात खूप आत्मविश्वास आहे. पण नकारात्मक मुद्दा असा आहे की त्यांना सर्व काही माहीत आहे.

कपिल देव म्हणाले, ”भारतीय खेळाडू खूप आत्मविश्वासू आहेत. परंतु त्यांना असे वाटते की आपल्याला कोणाकडून काहीही विचारण्याची गरज नाही.माझा विश्वास आहे की एक अनुभवी व्यक्ती तुम्हाला नेहमीच मदत करू शकते. पैशासोबत अहंकार येतो. काही खेळाडू आहेत ज्यांचा अहंकार त्यांना सुनील गावसकरसारख्या दिग्गजांचा सल्ला घेण्यास प्रतिबंधित करतो. अनेकदा असे होते की जेव्हा जास्त पैसा येतो तेव्हा त्याच्यासोबत अहंकारही येतो. या क्रिकेटपटूंना वाटते की त्यांना सर्व काही माहीत आहे. हा देखील मोठा फरक आहे.”

हेही वाचा – World Cup 2023 : भारत-पाकिस्तान सामना आता ‘या’ तारखेला, नवीन तारीख ठरली!

”मी सांगू इच्छितो की येथे अनेक क्रिकेटपटू आहेत ज्यांना मदतीची गरज आहे. सुनील गावसकर असताना तुम्ही त्यांच्याशी का बोलू शकत नाही? खेळाडूंना वाटते की आपण पुरेसे चांगले आहोत. तो चांगला असेल, पण 50 सीझन क्रिकेट पाहिलेल्या व्यक्तीकडूनही मदत घेतली पाहिजे. कधी कधी एखाद्याचे ऐकूनही तुमचे विचार बदलतात”, असे ते म्हणाले.

विंडीजविरुद्धच्या दुसऱ्या वनडेत पराभव

भारतीय संघ सध्या वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर आहे, जिथे त्यांना यजमान विंडीजविरुद्धच्या 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसऱ्या सामन्यात 6 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. टीम इंडियाने केवळ 182 धावांचे लक्ष्य दिले होते, जे विंडीजने 80 चेंडू राखून पूर्ण केले आणि मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली.

आता वनडे मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना 1 ऑगस्टला त्रिनिदादच्या ब्रायन लारा स्टेडियमवर खेळवला जाईल. कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली दुसऱ्या वनडेत खेळले नाहीत. हार्दिक पांड्याने कमान सांभाळली. रोहित आणि कोहलीने सतत क्रिकेट आणि नवीन रणनीती अंतर्गत विश्रांती घेतली होती. तिसऱ्या सामन्यात ते खेळताना दिसणार आहेत.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment