Asia Cup 2023 : आशिया कप 2023 आज 30 ऑगस्टपासून सुरू होत आहे. पाकिस्तानचा संघ नेपाळसोबत पहिला सामना खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. 2 दिवसांनंतर टीम इंडियाचे खेळाडूही या शानदार स्पर्धेत सहभागी होताना दिसणार आहेत. त्याआधी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने स्वतःचा लूक तयार केला आहे. मोहम्मद शमीचे आता हेअर ट्रान्सप्लांट झाले आहे. तब्बल 2 वर्षांनंतर त्याने पुन्हा एकदा ऋषभ पंतला सडेतोड उत्तर दिले आहे.
2 वर्षांपूर्वी ऋषभ पंतने शमीला त्याच्या वाढदिवशी केसगळतीची समस्या सांगून खूप ट्रोल केले होते. कदाचित मोहम्मद शमीला याचे वाईट वाटले असेल आणि त्याने त्याचे हेअर ट्रान्सप्लांट केले असेल. शमीच्या वाढदिवसानिमित्त त्याला शुभेच्छा देताना ऋषभ पंतने लिहिले, “केस आणि वय वेगाने जात आहे, मोहम्मद शमीला वाढदिवसाच्या शुभेच्छा.” मात्र, शमीही गप्प बसणारा नव्हता. ऋषभ पंतला उत्तर देताना त्याने लिहिले, “अपना समय आयेगा बेटा. केस आणि वय कोणीही रोखू शकत नाही. पण लठ्ठपणावर उपचार आजही केले जातात.”
हेही वाचा – Holidays In September 2023 : सप्टेंबरमध्ये शाळा ‘इतके’ दिवस बंद!
मोहम्मद शमी आशिया कप 2022 मध्ये खेळताना दिसणार आहे. त्याने 22 मार्च रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटचा एकदिवसीय सामना खेळला. शमीची वनडेतील कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. त्याने आतापर्यंत 90 एकदिवसीय सामन्यांमध्ये 162 विकेट घेतल्या आहेत. त्याची सरासरी 27च्या आसपास आहे. त्याने एकदा 5 विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!