PHOTOS : क्रिकेटर मोहम्मद शमीवर इंग्लंडमध्ये पार पडली शस्त्रक्रिया

WhatsApp Group

Mohammed Shami Surgery I भारतीय क्रिकेट संघाचा सुपरस्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी सध्या संघाबाहेर आहे. गेल्या वर्षी भारतात खेळल्या गेलेल्या आयसीसी एकदिवसीय विश्वचषकाचा हिरो शमी दुखापतीमुळे मैदानापासून दूर आहे. त्याने शस्त्रक्रियेनंतरचे फोटो शेअर केले आहेत. टाचेच्या दुखापतीमुळे त्रस्त झालेल्या शमीवर इंग्लंडमध्ये शस्त्रक्रिया झाली असून आता तो तंदुरुस्त होऊन पुनरागमन करण्यास उत्सुक आहे.

2023 विश्वचषकाचा नायक मोहम्मद शमी याच्या टाचेवर लंडनमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. शमीने शस्त्रक्रियेनंतरचे त्याचे फोटो त्याच्या चाहत्यांसाठी शेअर केले आहेत. डाव्या पायाच्या घोट्याच्या समस्येने त्रस्त असतानाही शमीने 2023 चा संपूर्ण विश्वचषक खेळल्याचे वृत्त होते.

मोहम्मद शमीने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तो हॉस्पिटलमध्ये बेडवर पडलेला दिसत आहे. त्याच्या नाकात ऑक्सिजन ट्यूब आहे. ऑपरेशननंतर शमीने इंस्टाग्रामवर लिहिले, “माझ्या अकिलीस टेंडन टाचवर नुकतीच यशस्वी शस्त्रक्रिया झाली आहे. बरे होण्यास वेळ लागणार आहे, पण मी माझ्या पायावर उभे राहण्यासाठी खूप उत्सुक आहे.”

हेही वाचा – आसाममध्ये 89 वर्ष जुना कायदा रद्द करण्याचा निर्णय!

मोहम्मद शमीने 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकात भारताला अंतिम फेरीत नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. या स्पर्धेत वेगवान गोलंदाजांनी सर्वाधिक विकेट घेतल्या होत्या. केवळ 7 सामने खेळल्यानंतर शमीच्या खात्यात एकूण 24 विकेट जमा झाल्या. न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यात त्याने 57 धावांत 7 विकेट घेतल्या होत्या.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment