Mohammed Shami IPL 2024 | आयपीएल 2024 सुरू होण्यापूर्वी एक मोठे अपडेट समोर आले आहे. भारताचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आयपीएलमधून बाहेर गेला आहे. त्याच्या डाव्या पायाच्या घोट्याला दुखापत झाली आहे. यासाठी शमीवर ब्रिटनमध्ये शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. बीसीसीआयच्या सूत्राने ही माहिती पीटीआय या वृत्तसंस्थेला दिली आहे. शमीला विश्वचषकानंतर भारतीय संघासाठी एकही सामना खेळता आलेला नाही.
मोहम्मद शमीची आयपीएल कारकीर्द खूपच चमकदार आहे. शमीने आतापर्यंत 110 आयपीएल सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 26.87 च्या सरासरीने आणि 8.44 च्या इकॉनॉमी रेटने 127 बळी घेतले आहेत. शमीने दोन वेळा एका डावात चार विकेट घेतल्या आहेत.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!