

Mohammad Juned Khan Success Story : इराणी चषकाचे विजेतेपद पटकावण्यात मुंबई संघाला यश आले आहे. तब्बल 27 वर्षांनंतर पुन्हा एकदा इराणी चषक जिंकण्यात मुंबईला यश आले आहे. अंतिम फेरीत शेष भारताचा पराभव करून, मुंबईने 15व्यांदा इराणी चषक 2024 चे विजेतेपद जिंकले. यावेळी स्पर्धेमध्ये एका वेगवान गोलंदाजाने मुंबईसाठी पदार्पण केले ज्याने आपल्या गोलंदाजीने भविष्याच्या आशा उंचावल्या आहेत. त्याचे नाव जुनेद खान आहे.
जुनेद खान हा कन्नौजचा रहिवासी आहे. क्रिकेटचा प्रवास त्याच्यासाठी खूप संघर्षमय राहिला आहे. जुनेद क्रिकेटर बनण्याचे स्वप्न घेऊन मुंबईत पोहोचला होता, पण क्रिकेटच्या मैदानात जाऊन खेळणे त्याच्यासाठी सोपे नव्हते. मुंबईतील त्यांच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये त्यांना उदरनिर्वाहासाठी ऑटोरिक्षा चालवावी लागली. एका वृत्तानुसार, जुनेद मुंबईत आला तेव्हा तो 13 ते 14 वर्षांचा होता. मुंबईत आल्यानंतर त्याला उदरनिर्वाहासाठी ऑटोरिक्षा चालवावी लागली. आपल्या कुटुंबाच्या समस्या सोडवण्यासाठी जुनेद अल्पवयीन असूनही ऑटोरिक्षा चालवून काम करू लागला, असेही अहवालात म्हटले आहे.
Maiden First-Class wicket for Mohammad Juned Khan on debut
— BCCI Domestic (@BCCIdomestic) October 3, 2024
What a way to get off the mark! He gets the big wicket of captain Ruturaj Gaikwad#IraniCup | @IDFCFIRSTBank
Follow the matchhttps://t.co/Er0EHGOZKh pic.twitter.com/KvUOFHK6Nx
ऑटोरिक्षा चालवत असताना, तो एकदा संजीवनी क्रिकेट अकादमीत पोहोचला, जो मुंबईचा माजी यष्टीरक्षक मनीष बंगेरा चालवतो. जी त्याच्या घराजवळ होती. तो कन्नौजमध्ये टेनिस-बॉल क्रिकेट खेळत असे. अशा परिस्थितीत तो संजीवनी क्रिकेट अकादमीत खेळण्यासाठी आला होता. तेथे बंगेराने त्याला गोलंदाजी करताना पाहिले. बंगेराला त्याची गोलंदाजी आवडली म्हणून त्याने जुनेदला रोज येऊन गोलंदाजीचा सराव करायला बोलावले. त्यानंतर जुनेद रोज तिथे यायचा आणि गोलंदाजीचा सराव करायचा. संजीवनी क्रिकेट अकादमीमध्येच जुनेदने पहिल्यांदा लेदर बॉलने सराव करायला सुरुवात केली.
लॉकडाऊन दरम्यान, भारताचा सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायरने पोलीस शिल्डमध्ये पीजे हिंदू जिमखान्याकडून खेळताना त्याची प्रतिभा ओळखली. जुनेद म्हणाला, “अभिषेक नायरने मला खूप मदत केली. आज मी जो काही आहे तो त्याच्यामुळेच. तो नसता तर आज मी ज्या स्थानावर आहे त्या स्थानावर नसतो. त्याच्यामुळे मी ऑटोरिक्षा चालवणे थांबवायचे आणि माझा सगळा वेळ क्रिकेटला दिला, त्याने मला गेल्या आयपीएल हंगामात नेट बॉलर बनवले.”
हेही वाचा –VIDEO : हे आहे जगातील सर्वात मोठे घर, जिथे 20 हजार लोक एकत्र राहतात!
यानंतर जुनेदच्या कारकिर्दीत टर्निंग पॉइंट आला जेव्हा तो स्थानिक स्पर्धेत पीजे हिंदू जिमखानाचे प्रतिनिधित्व करताना सर्वांना प्रभावित करण्यात यशस्वी ठरला. बुची बाबू आणि केएससीए स्पर्धेसाठी संजय पाटील यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने जुनेदची निवड केली. जुनेदने या स्पर्धांमध्ये आपल्या गोलंदाजीने छाप पाडली होती. या स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी केल्यानंतर अखेर त्याला इराणी चषक स्पर्धेत मुंबईकडून पदार्पण करण्याची संधी मिळाली.
जुनेद खानने आतापर्यंत फक्त एकच प्रथम श्रेणी सामना खेळला आहे. आपल्या पदार्पणाच्या प्रथम श्रेणी सामन्यात मोहम्मद त्याने विरोधी संघाचा कर्णधार ऋतुराज गायकवाडला बाद करण्यात यश मिळवले. जुनेदची ही मेडन फर्स्ट क्लास विकेट होती. त्याच्या गोलंदाजीने सर्वांनाच प्रभावित केले आहे. आता इथून पुढे जुनेदची कारकीर्द आशांनी भरलेली आहे.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!