Mohammad Amir IPL 2024 : पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरला 2024 मध्ये ब्रिटीश पासपोर्ट मिळणार आहे. तो यानंतर आयपीएलमध्ये खेळताना दिसू शकतो. मोहम्मद आमिरने 2016 मध्ये ब्रिटीश नागरिक आणि वकील नरजीस खान यांच्याशी लग्न केले होते. मोहम्मद आमिर 2020 पासून इंग्लंडमध्ये राहत आहे. ब्रिटिश पासपोर्टसाठी, यूकेमध्ये 4 वर्षे राहणे आवश्यक आहे. आमिरपुढील वर्षी ब्रिटनमध्ये 4 वर्षे पूर्ण करणार आहे. यानंतर पाकिस्तानच्या या माजी वेगवान गोलंदाजाला ब्रिटिश पासपोर्ट मिळणार आहे.
आयपीएल खेळण्याविषयी आमिर म्हणाला…
मोहम्मद आमिर म्हणाला, ”यात अजून 1 वर्षाचा कालावधी बाकी आहे. त्यावेळी काय परिस्थिती असेल, आत्ताच सांगता येणार नाही. मी पुढे जात असलो तरी 1 वर्षानंतर मी कुठे असेल माहीत नाही, माझे भविष्य कोणालाच माहीत नाही. एकदा मला पासपोर्ट मिळाला. नक्की पण मी अजून चांगली संधी शोधणार आहे.” आमिरने स्पष्टपणे सांगितले की, ब्रिटिश पासपोर्ट मिळाल्यानंतर तो इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणार नाही. तो म्हणाला, ”मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाकिस्तानचे प्रतिनिधित्व केले आहे. भविष्यात मला पाकिस्तानकडून खेळण्याची संधी मिळाली तर मी त्यासाठी तयार आहे.”
Mohammad Amir will be receiving his British passport in 2024.
He's likely to participate in the IPL afterwards. pic.twitter.com/YquUmhHv3g
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) July 4, 2023
हेही वाचा – अजित भालचंद्र आगरकर : जे तेंडुलकरला जमलं नाही, ते या पठ्ठ्याने केलंय!
Rohit ❌
Kohli ❌
Dhawan ❌Mohammad Amir's sensational spell in the #CT17 final, #OnThisDay six years ago 🔥pic.twitter.com/dP8tDKvE4u
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) June 18, 2023
”…तर मी पुन्हा पाकिस्तानकडून खेळेन”
आमिर म्हणाला, ”अल्लाहची इच्छा असेल तर तो नक्कीच पुन्हा पाकिस्तानसाठी खेळेल.” खरे तर पाकिस्तानमध्ये सत्ताबदल झाल्यानंतर रमीझ राजा यांना पीसीबीच्या अध्यक्षपदावरून हटवण्यात आले होते. राजा यांनी पीसीबीच्या अध्यक्षपदावरून पायउतार झाल्यानंतर मोहम्मद आमिरच्या पुनरागमनाबद्दल अटकळ बांधली जात आहे. याशिवाय ब्रिटिश पासपोर्ट मिळाल्यानंतर तो आयपीएलमध्ये खेळू शकतो, असे मानले जात आहे. विशेष म्हणजे IPL च्या पहिल्या सत्रात म्हणजेच 2008 मध्ये पाकिस्तानी खेळाडूंनी भाग घेतला होता.
Mohammad Amir said – "Talking about playing IPL, there is one more year to go. I always say that I go step by step. We don't know what will happen tommorow and I start thinking about playing IPL in 2024". (To ARY news) pic.twitter.com/sSJm2kDiFE
— CricketMAN2 (@ImTanujSingh) July 4, 2023
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!