डेव्हिड वॉर्नर लायकीचा नाही, असं मिचेल जॉन्सन का म्हणतोय?

WhatsApp Group

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा ओपनर डेव्हिड वॉर्नरबाबत मिचेल जॉन्सनने (Mitchell Johnson On David Warner) अतिशय स्फोटक विधान केले आहे. पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेत वॉर्नरला संधी दिल्याने जॉन्सनचा तिळपापड झाला. पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांची कसोटी मालिका 14 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. पहिला कसोटी सामना 14 ते 18 डिसेंबर दरम्यान पर्थ येथे खेळवला जाईल.

पाकिस्तानला 26 ते 30 डिसेंबर दरम्यान मेलबर्नमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसरा कसोटी सामना खेळायचा आहे. पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा आणि शेवटचा कसोटी सामना सिडनी येथे 3 ते 7 जानेवारी 2024 या कालावधीत नवीन वर्षात खेळवला जाईल. पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाच्या 14 सदस्यीय संघात स्फोटक अष्टपैलू डेव्हिड वॉर्नरला संधी देण्यात आली. मिचेल जॉन्सनने त्याचा वॉर्नरला मालिकेद्वारे निरोप देण्यावर जोरदार टीका केली.

मिचेल जॉन्सन म्हणाला, ”2018 मध्ये बॉल टॅम्परिंगची घटना घडल्यानंतर आणि त्यानंतर एक वर्षाच्या बंदीला सामोरे जावे लागल्यानंतर, डेव्हिड वॉर्नर हिरोसारखा निरोप घेण्यास पात्र नाही.” जॉन्सनने 2018 मध्ये झालेल्या बॉल टॅम्परिंग प्रकरणात अडकलेल्या डेव्हिड वॉर्नरला आरोपी म्हणून नाव दिले. वृत्तानुसार, डेव्हिड वॉर्नरने पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेतच या फॉरमॅटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. ‘द वेस्ट ऑस्ट्रेलियन’साठी कॉ़लम लिहिणारा मिचेल जॉन्सन म्हणाला, ”पाच वर्षे झाली आहेत. डेव्हिड वॉर्नर अजूनही त्याच उद्दामपणावर आणि आपल्या देशाबद्दलच्या अनादरावर आधारित आहे. वॉर्नरच्या निरोपाच्या मालिकेसाठी आम्ही तयारी करत आहोत, कोणी सांगेल का असे का? स्ट्रगल करणाऱ्या कसोटी ओपनरला स्वतःच्या रिटायरमेंटची तारीख का निवडावी लागते? आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेट इतिहासातील सर्वात मोठ्या घोटाळ्यात अडकलेल्या खेळाडूला हिरोचा निरोप का मिळत आहे?”

हेही वाचा – शिवराज सिंह चौहान यांची फेमस स्कीम ‘लाडली बहना योजना’ काय आहे?

‘सँडपेपर गेट’ घोटाळ्यात वॉर्नरसोबत स्टीव्ह स्मिथ आणि कॅमेरून बॅनक्रॉफ्ट यांनाही ऑस्ट्रेलियन बोर्डाने शिक्षा केली होती. या घटनेनंतर निलंबन संपल्यानंतरही स्मिथ आणि वॉर्नर यांना कर्णधारपदापासून वंचित ठेवण्यात आले होते.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment