“भारतासाठी संपूर्ण स्पर्धा….”, मायकेल वॉनने ICC वर लावले गंभीर आरोप; सेमीफायनलपूर्वी भडकला

WhatsApp Group

IND vs ENG Semi Final 2 Michael Vaughan : आयसीसी टी-20 विश्वचषकाचा दुसरा उपांत्य सामना भारत आणि इंग्लंड यांच्यात होणार आहे. या सामन्याची जोरदार चर्चा आहे. दोन्ही संघांच्या खेळापेक्षा जास्त चर्चा पावसावर होत असून त्यामुळे न खेळता बाद होण्याचा धोका इंग्लिश संघावर आहे. या चर्चेत इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनने उडी घेत आयसीसीवर गंभीर आरोप केले आहेत. तो म्हणतो की आयसीसीने भारतीय संघासाठी स्पर्धेतील इतर संघांवर अन्याय केला आहे.

आयसीसी टी-20 विश्वचषकाच्या पहिल्या उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेच्या संघाने अफगाणिस्तानचा पराभव करत प्रथमच अंतिम फेरीत धडक मारली. एकतर्फी झालेल्या सामन्यात प्रोटीज गोलंदाजांनी अफगाणिस्तान संघाला अवघ्या 56 धावांत गुंडाळले. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने हे लक्ष्य 8.5 षटकांत पूर्ण करून इतिहास रचला. आता अंतिम फेरीत त्याच्यासोबत कोणता संघ खेळणार हे भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामन्यावर ठरणार आहे. यावरून वादाला तोंड फुटले आहे.

इंग्लिश कर्णधाराचा गंभीर आरोप

इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन याने आयसीसीवर या टी-20 विश्वचषकात भारताला फायदा मिळवून देण्यासाठी काम केल्याचा गंभीर आरोप केला आहे. दुसऱ्या सेमीफायनलपूर्वी त्याने त्याच्या सोशल अकाऊंटवर लिहिले की, ”नक्कीच हा सेमीफायनल मॅच गयानामध्ये व्हायला हवा होता. ही संपूर्ण स्पर्धा भारतासाठी आयोजित केली जात आहे, त्यामुळे उर्वरित संघावर तो पूर्णपणे अन्यायकारक आहे.”

हेही वाचा – सूर्यकुमार यादवला मागे टाकत ट्रॅव्हिस हेड बनला जगातील ‘सर्वात भारी’ खेळाडू!

वॉनला राग का आला?

भारत आणि इंग्लंड यांच्यातील उपांत्य फेरीच्या सामन्यावर पावसाचे सावट आहे. गयानामध्ये वर्षाच्या या महिन्यांत पाऊस पडतो, जिथे हा सामना खेळला जाणार आहे. दुसरा उपांत्य सामना भारतीय प्रेक्षकांना डोळ्यासमोर ठेवून आयोजित केला जात आहे, त्यामुळे राखीव दिवस ठेवता आला नाही. पावसामुळे सामना वाहून गेला, तर गुणतालिकेत भारताच्या खाली असल्यामुळे इंग्लंड बाहेर पडेल.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment