IPL 2023 : ऑस्ट्रेलियाचे ‘हे’ दोन दिग्गज आयपीएलपासून राहणार लांब..! मुंबईनं पोलार्डला सोडलं

WhatsApp Group

IPL 2023 : आयपीएल २०२३ लिलाव २३ डिसेंबर रोजी कोची येथे होणार आहे. त्याच वेळी, आयपीएल संघांना १५ नोव्हेंबरपर्यंत कायम ठेवलेल्या आणि सोडलेल्या खेळाडूंना अंतिम यादी द्यावी लागली आहे. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज (CSK) सह जवळपास सर्व संघांनी त्यांच्या कायम ठेवलेल्या आणि सोडलेल्या खेळाडूंची अंतिम यादी तयार केली. तथापि, आयपीएल संघांनी अधिकृतपणे कायम ठेवलेल्या आणि सोडलेल्या खेळाडूंची अंतिम यादी अद्याप जाहीर केलेली नाही.

दरम्यान, मीडिया रिपोर्ट्सनुसार, ऑस्ट्रेलियाचे पॅट कमिन्स आणि मिचेल स्टार्क आयपीएल २०२३ चा भाग असणार नाहीत. वास्तविक, पॅट कमिन्स हा कोलकाता नाईट रायडर्सचा भाग आहे. मिचेल स्टार्क आयपीएल मेगा लिलाव २०२२ चा भाग नव्हता, त्यामुळे तो सध्या कोणत्याही संघाचा भाग नाही. याशिवाय गुजरात टायटन्सने मॅथ्यू वेडला कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तर शाहरुख खानची टीम कोलकाता नाईट रायडर्सने शार्दुल ठाकूरला दिल्ली कॅपिटल्समध्ये ट्रेड केले आहे.

हेही वाचा – Gold Silver Price Today : ५३ हजारांवर पोहोचलं सोनं..! चांदीचा भाव झाला ‘इतका’; वाचा आजचा दर!

मीडिया रिपोर्ट्सनुसार मुंबई इंडियन्सने कायरन पोलार्डला सोडले आहे. वास्तविक, आयपीएल २०१० पासून पोलार्ड मुंबई इंडियन्सशी संबंधित आहे. मुंबई इंडियन्सच्या संघाने सर्वाधिक वेळा आयपीएलचे जेतेपद पटकावले आहे, मुंबई इंडियन्सच्या यशात कोरोन पोलार्डचा मोठा वाटा मानला जातो. दरम्यान, इंग्लंडचा खेळाडू सॅम बिलिंग्सने ट्विट करत तो २०२३ च्या आयपीएलमध्ये खेळणार नाही, असे म्हटले. सॅम बिलिंग्सच्या म्हणण्यानुसार, त्याला कसोटी क्रिकेटवर लक्ष केंद्रित करायचे आहे, त्यामुळे तो आयपीएलच्या पुढील हंगामात खेळणार नाही.

Leave a comment