धोनीला, हॉकीला आणि आता गुकेशला विश्वविजेता केलं, भारतावर ‘या’ फॉरेन कोचचं लय प्रेम!

WhatsApp Group

D Gukesh Paddy Upton Story : भारताच्या डोम्माराजू गुकेशने 14व्या फेरीत चीनच्या डिंग लिरेनचा पराभव करून 2024 ची जागतिक बुद्धिबळ स्पर्धा जिंकली आहे. वयाच्या अवघ्या 18व्या वर्षी सिंगापूरमध्ये खेळली गेलेली ही स्पर्धा जिंकून गुकेश जगातील सर्वात तरुण बुद्धिबळ चॅम्पियन बनला आहे. त्याने गॅरी कास्पारोव्हचा विक्रम मोडला आहे, ज्याने 1985 मध्ये 22 वर्षे 6 महिने वयाच्या विश्वविजेतेपदाचा मान मिळवला होता.

डोम्माराजू गुकेश चेस वर्ल्ड चॅम्पियन बनण्यात दक्षिण आफ्रिकेच्या पॅडी अप्टनचे कनेक्शन समोर आले आहे. पॅडी अप्टन प्रसिद्ध मेंटल आणि कंडिशनिंग प्रशिक्षक आहेत. याआधीही त्यांनी 2011 मध्ये विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय क्रिकेट संघासोबत काम केले आहे. 2024 साली पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या संघासोबत ते होते.

पॅडी यांनी सांगितले की गुकेशने या वर्ल्ड चेस चॅम्पियनशिप आधी स्वतःला कसे तयार केले. एका व्हिडिओमध्ये गुकेशने स्वत: या चॅम्पियनशिपसाठी कशी तयारी केली, पॅडी यांनी त्याला कसे तयार केले हे सांगितले. तो मानसिकदृष्ट्या कणखर बनला. गेल्या काही महिन्यांपासून पॅडीसोबत जवळून काम करत असल्याचे गुकेशने सांगितले होते. 3 डिसेंबरला शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये त्याने फायनलच्या तयारीबद्दल सांगितले की, पॅडी यांच्यासोबत काम करणे खूप आनंददायी होते.

हेही वाचा – स्टार्टअप इंडियावर नोंदणीकृत 5000 स्टार्टअप्स बंद, यात महाराष्ट्र आघाडीवर!

इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना अप्टन डी गुकेशबद्दल म्हणाले, त्याने संपूर्ण स्पर्धेत ज्या प्रकारे स्वत:ला हाताळले त्याचा त्याला अभिमान वाटला पाहिजे. वयाच्या 18व्या वर्षी त्याने आपल्या पहिल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये विलक्षण परिपक्वता दाखवली. आम्ही त्याच्या रणनीतीच्या इतर पैलूंवर चर्चा केली. जेव्हा तो खेळात पुढे असतो तेव्हा तो स्वतःला कसे हाताळेल, जेव्हा तो खेळात मागे असतो किंवा खेळादरम्यान दबावाखाली असतो तेव्हा तो स्वतःला कसे हाताळेल? जर तो स्पर्धेत पुढे असेल, एक गेम पुढे असेल, मागे राहिला असेल, 6-6 अशी स्थिती असेल, तर तो स्वत:ला कसा सांभाळेल. म्हणजेच आम्ही प्रत्येक परिस्थितीसाठी तयारी केली होती.

या विजयासह 18 वर्षीय डी गुकेश बुद्धिबळातील सर्वात तरुण विश्वविजेता ठरला आहे. याशिवाय, विक्रमाच्या शोधात तो विश्वनाथन आनंद यांच्या क्लबमध्येही सामील झाला. जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन बनणारा गुकेश हा भारताचा दुसरा खेळाडू ठरला आहे. तर विश्वनाथन हे पहिले भारतीय आहेत. 5 वेळा विश्वविजेता विश्वनाथन आनंद यांनी 2013 मध्ये शेवटचे विजेतेपद पटकावले होते. रशियन दिग्गज गॅरी कास्परोव्ह हे यांनी वयाच्या 22 व्या वर्षी 1985 मध्ये अनातोली कार्पोव्ह यांचा पराभव करून विजेतेपद पटकावले होते.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment