मयंक यादवचा चीफ सिलेक्टरलाच धक्का! 18 वर्ष जुन्या विक्रमाची बरोबरी

WhatsApp Group

Mayank Yadav : भारतीय संघाचा उदयोन्मुख वेगवान गोलंदाज मयंक यादवने मैदानात उतरताच भारतीय क्रिकेट चाहत्यांना अपेक्षित कामगिरी केली. मयंक यादवने त्याच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात मेडन ओव्हर टाकली. यासह मयंकने मुख्य निवडकर्ता अजित आगरकरच्या विक्रमाची बरोबरी केली. आगरकर हा त्याच्या पहिल्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात मेडन ओव्हर टाकणारा पहिला भारतीय गोलंदाज होता.

मयंक यादवने 6 ऑक्टोबर रोजी भारत विरुद्ध बांगलादेश सामन्याने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात केली. हा सामना ग्वाल्हेरमध्ये झाला. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करत बांगलादेशचा संपूर्ण संघ 127 धावांत गुंडाळला. यानंतर अवघ्या 11.5 षटकांत 3 गडी गमावून 132 धावा करून सामना जिंकला. भारताकडून हार्दिक पांड्या (16 चेंडूत नाबाद 39) याने सर्वाधिक धावा केल्या. अर्शदीप सिंग आणि वरुण चक्रवर्ती हे प्रत्येकी 3 बळी घेत सर्वाधिक यशस्वी गोलंदाज ठरले.

प्लेइंग इलेव्हनमध्ये मयंक यादवचे नाव पाहिल्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव त्याला नव्या चेंडूसह संधी देईल, अशी आशा क्रिकेट चाहत्यांना वाटली असेल. सूर्याने हे केले नाही. पहिली चार षटके अर्शदीप सिंग आणि हार्दिक पांड्याने टाकली. पाचवे षटक वरुण चक्रवर्तीने टाकले, यानंतर मयंक यादवकडे चेंडू आला.

हेही वाचा – रतन टाटा यांची तब्येत बिघडल्याची बातमी खोटी! स्वत: पोस्ट करत सांगितले, की….

मयंक यादवने आपल्या पहिल्याच षटकात शानदार गोलंदाजी करत बांगलादेशला एकही धाव काढू दिली नाही. तौहीद हृदयच्या सर्व प्रयत्नांनंतरही या षटकात एकही धाव झाली नाही. यासह मयंक यादव पहिल्या टी-20 सामन्यात मेडन ओव्हर टाकणारा तिसरा भारतीय गोलंदाज ठरला. अशी कामगिरी करणारा अजित आगरकर पहिला गोलंदाज ठरला आहे. अर्शदीप सिंगने दोन वर्षांपूर्वी आगरकरच्या विक्रमाची बरोबरी केली होती. आता या यादीत मयंकचेही नाव जोडले गेले आहे. मयंक यादवचे सामन्यातील एकूण गोलंदाजीचे विश्लेषण 4-1-21-1 असे होते.

2006/07 मध्ये भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात खेळल्या गेलेल्या एकमेव सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्याने आगरकरने आपल्या टी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात केली होती.

व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment