ऋतुराजचे लग्न, सायली संजीवने शेअर केला फोटो! म्हणाली, “तुमच्यासाठी खूपच….”

WhatsApp Group

Sayali Sanjeev On Ruturaj Gaikwad Marriage : चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) फलंदाज ऋतुराज गायकवाड विवाहबद्ध झाला आहे. उत्कर्षा पवार हिच्याशी त्याचा विवाह झाला. ऋतुराजने लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. जे सोशल मीडियावरही खूप व्हायरल होत आहेत. फोटोंमध्ये ऋतुराजची जोडीदार उत्कर्षा ही एखाद्या चित्रपट अभिनेत्रीपेक्षा कमी दिसत नाही. सौंदर्याच्या बाबतीत, उत्कर्षा भल्याभल्यांना टक्कर देत आहे. प्रत्येकजण तिच्या सौंदर्याचे कौतुक करताना दिसत आहे. आता दोघांच्या लग्नानंतर मराठी अभिनेत्री सायली संजीवने एक स्टोरी इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.

सायली संजीवकडून अभिनंदन

सायलीने ऋतुराज आणि उत्कर्षा यांना लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सायली म्हणाली, ”तुमच्यासाठी खूपच आनंदी आहे, अभिनंदन ऋतुराज आणि उत्कर्षा’. तिने यासोबत हार्ट इमोजी पोस्ट करत त्या दोघांना या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये टॅगही केले आहे.

 

पुण्यात जन्मलेल्या ऋतुराज गायकवाडचे नाव याआधी सायली संजीव हिच्याशी जोडले जात होते. याबाबत ऋतुराज काही काळ चर्चेत राहिला. या अफेअरच्या चर्चेनंतर सायली म्हणाली होती, ”आमच्या दोघांमध्ये काहीही नाही. या अफवांमुळे आमची मैत्री बिघडली आहे. अजिबात काहीच नव्हते. आपण एकमेकांशी मित्र म्हणून बोलू शकत नाही का? गॉसिपर्सना ही गोष्ट समजत नाही. या गोष्टी आपल्या जीवनावर परिणाम करतात.”

हेही वाचा – Photos : ऋतुराज गायकवाड चढला बोहल्यावर…! पवारांच्या लेकीसोबत बांधली लग्नगाठ

सायलीसोबतच्या अफेअरबाबत ऋतुराज गायकवाडनेही मराठीत उत्तर दिले होते. ”माझी विकेट फक्त गोलंदाजच घेऊ शकतो. फक्त गोलंदाजच मला क्लीन बोल्ड करू शकतात. आणखी कोणीही नाही”, असे ऋतुराज म्हणाला होता.

ऋतुराजने एका महिला क्रिकेटरशी लग्न केले आहे. नुकत्याच झालेल्या आयपीएल फायनलमध्येही दोघे एकत्र दिसले होते. आयपीएलचे जेतेपद पटकावल्यानंतर उत्कर्षाने धोनीचे पाय स्पर्श करून आशीर्वादही घेतला होता. ज्याचे फोटो आणि व्हिडिओही सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. तेव्हापासून उत्कर्षा सोशल मीडियाच्या ट्रेंडमध्ये आहे.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

 

Leave a comment