Manoj Tiwary : 3 ऑगस्ट रोजी क्रिकेटच्या प्रत्येक फॉरमॅटला अलविदा करणारा भारताचा माजी फलंदाज मनोज तिवारीने केवळ 5 दिवसांनी यू-टर्न घेतला आहे. मनोज आता पुन्हा एकदा बंगालकडून क्रिकेट खेळताना दिसणार आहे. गेल्या गुरुवारी त्याने इंस्टाग्रामवर क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. मनोज तिवारीने आपल्या इन्स्टा पोस्टमध्ये प्रशिक्षक, कुटुंब, क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगाल आणि इतर अनेकांचे आभार मानले आहेत.
आता समोर आलेल्या नवीन वृत्तानुसार मनोज तिवारी क्रिकेटमध्ये पुनरागमन करत असून निवृत्तीचा निर्णय मागे घेतला आहे. क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालचे (CAB) अध्यक्ष स्नेहशिष गांगुली यांच्याशी चर्चा केल्यानंतर मनोजने आपला निर्णय बदलला. CAB सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तो क्रिकेटच्या मैदानात परतणार आहे. त्याचबरोबर 8 ऑगस्टला पत्रकार परिषद घेऊन मनोज तिवारी अधिकृत घोषणा करू शकतो, असेही सांगण्यात आले आहे.
August 3rd – Manoj Tiwary retires from cricket.
August 8th – Manoj Tiwary take back his retirement & will continue playing. [RevSportz] pic.twitter.com/KA9oU7lDpK
— Johns. (@CricCrazyJohns) August 8, 2023
हेही वाचा – अमेरिकेत हजारो उड्डाणे रद्द, सर्वत्र अंधार, शाळांना सुट्टी, घरातील वीजही गायब!
ममता बॅनर्जी यांच्या सरकारमध्ये क्रीडामंत्री मनोज तिवारीने गेल्या रणजी मोसमात बंगाल संघाची धुरा सांभाळली होती. त्याच्या नेतृत्वाखाली बंगालने सौराष्ट्रविरुद्ध रणजी ट्रॉफीचा अंतिम सामना खेळला आणि उपविजेता ठरला. मनोज तिवारी केवळ टीम इंडियासाठीच खेळला नाही, तर त्याने इंडियन प्रीमियर लीगमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्स, कोलकाता नाइट रायडर्स, किंग्ज इलेव्हन पंजाब आणि इतर अनेक संघांचे प्रतिनिधित्व केले आहे.
मनोज तिवारीने भारतासाठी 12 एकदिवसीय आणि तीन टी-20 सामन्यांमध्ये भाग घेतला. एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये, तिवारीने 26.09 च्या सरासरीने 287 धावा केल्या, त्यात एक शतक आणि अर्धशतकांचा समावेश आहे. तिवारीने आपले एकमेव शतक (104*) वेस्ट इंडिजविरुद्ध झळकावले. मनोज तिवारीने T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 15 धावा केल्या.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!