Paris 2024 Olympics : जेव्हा आख्खा भारत झोपला होता, तेव्हा मनिका बत्रानं रचला इतिहास!

WhatsApp Group

India At Paris 2024 Olympics : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताने नवा इतिहास रचला आहे. मनिका बत्राने टेबल टेनिस महिला एकेरीत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. फ्रान्सच्या प्रितिका पावडचा सरळ सेटमध्ये पराभव करून मनिकाने अंतिम 16 मध्ये प्रवेश केला आहे. शेवटच्या 32 फेरीत मनिकाचा सामना यजमान फ्रान्सशी झाला. प्रितिकाचा रँक मनिकापेक्षा वरचा होता. जागतिक क्रमवारीत भारतीय वंशाची प्रितिका 12व्या आणि मनिका 18व्या क्रमांकावर होती, मात्र मनिकाने सुरुवातीपासूनच सामन्यावर वर्चस्व गाजवले.

मनिकाने हा सामना सलग 4-0 ने जिंकला. तिने हा सामना 11-9, 11-6, 11-9, 11-7 ने जिंकला. ऑलिम्पिकच्या इतिहासात भारतीय महिला खेळाडूने उपांत्यपूर्व फेरी गाठण्याची ही पहिलीच वेळ आहे. मनिकाच्या चमकदार कामगिरीमुळे तिच्या पदकाच्या आशा वाढल्या आहेत.

सलग 2 सेट गमावल्यानंतर फ्रेंच खेळाडूने पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला आणि मनिकाविरुद्ध सलग 4 गेम पॉइंट वाचवले. मनिकाने ब्रेक घेतला आणि पुन्हा सेट जिंकण्यासाठी पुनरागमन केले. संपूर्ण सामन्यात मनिकाच्या आक्रमक खेळाला विरोधी खेळाडूकडे उत्तर नव्हते.

हेही वाचा – 1 ऑगस्टपासून सर्वसामान्यांच्या खिशावर पडणार ताण! बदलणार ‘हे’ नियम; वाचा

मनिकाचा पुढील सामना हाँगकाँगच्या झू चेंगजू आणि जपानच्या मियू हिरानो यांच्यातील विजेत्याशी होईल. मनिकाने कॉमनवेल्थ आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत पदके जिंकली असून यावेळी संपूर्ण देश तिच्याकडून ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याची अपेक्षा करत आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment