IPL 2024 : स्टेडियममध्ये मॅच पाहायला गेला तरुण, असं काही झालं, की असोसिएशनवर केली FIR

WhatsApp Group

IPL 2024 : बंगळुरू येथील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर 12 मे रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील आयपीएल 2024 चा सामना रंगला. या सामन्यादरम्यान प्रेक्षकांना शिळे अन्न दिल्याबद्दल कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनच्या व्यवस्थापनाविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

केएससीए व्यवस्थापन आणि कॅन्टीन व्यवस्थापकाविरुद्ध कब्बन पार्क पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. 23 वर्षीय चैतन्य नावाच्या तरुणाने ही तक्रार दाखल केली असून तो त्याचा मित्र गौतमसोबत कतार एअरवेज फॅन्स टेरेस स्टँडवरून स्टेडियममध्ये सामना पाहत होता. सामन्यादरम्यान चैतन्यने स्टँडवर उपस्थित असलेल्या कॅन्टीनमधील जेवण खाल्ले. तूप भात, इडली, चना मसाला, कटलेट, रायता आणि कोरडे जामुन खाल्ले. चैतन्यला जेवल्यानंतर काही वेळाने पोटात दुखू लागले.

हेही वाचा –“माझी मदत करायला कुणीही पुढे आलं नाही…”, रोहित शर्माने व्यक्त केली वेदना; म्हणाला, “मला संशय येऊ लागला….”

यानंतर चैतन्य बसलेला असताना खाली पडला. स्टेडियमच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने स्टेडियमबाहेर असलेल्या ॲम्ब्युलन्समध्ये त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. यानंतर त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी चैतन्यची तपासणी केली असता त्याला अन्नातून विषबाधा झाल्याची पुष्टी केली. चैतन्यची तब्येत बिघडण्यामागे कँटीनमध्ये दिले जाणारे जेवण असल्याचा आरोप आहे.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment