Man Dies Of Heart Attack While Watching IND vs PAK Match : आसाममधील शिवसागर जिल्ह्यात भारत-पाकिस्तान टी-२० क्रिकेट सामना पाहत असताना हृदयविकाराच्या झटक्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला. रविवारी संध्याकाळी ही घटना घडली असून ३४ वर्षीय बिटू गोगोई असे त्या व्यक्तीचे नाव आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, गोगोई त्यांच्या काही मित्रांसह रविवारी संध्याकाळी एका स्थानिक सिनेमा हॉलमध्ये गेले होते, जिथे सामन्याचे थेट प्रक्षेपण केले जात होते. पण, सामन्यादरम्यान गोगोई अचानक बेशुद्ध पडले. त्याच्या मित्रांनी त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, क्रिकेट सामन्यादरम्यान चित्रपटगृहात जास्त प्रमाणात ध्वनिप्रदूषण झाल्यामुळे गोगोई यांना हृदयविकाराचा झटका आला. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. दरम्यान, शिवसागर पोलिसांच्या पथकाने घटनेचा तपास सुरू केला आहे. त्यांच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, गोगोई निरोगी होते आणि त्यांना कोणतीही आरोग्य समस्या नव्हती.
हेही वाचा – T20 World Cup 2022 IND Vs PAK : हुश्श…! चुरशीच्या लढतीत भारताचा ‘विराट’ विजय; किंग चमकला!
Special win. Thank you to all our fans for turning up in numbers. 🇮🇳💙 pic.twitter.com/hAcbuYGa1H
— Virat Kohli (@imVkohli) October 23, 2022
असा रंगला सामना…
विराट कोहली (नाबाद ८२) आणि हार्दिक पंड्या (४०) यांच्या उत्कृष्ट भागीदारीमुळे भारताने मेलबर्न क्रिकेटमध्ये टी-२० विश्वचषकाच्या सुपर १२ गटातील सामन्यात पाकिस्तानला ४ गड्यांनी हरवले. यासोबतच गेल्या विश्वचषकात पाकिस्तानविरुद्धच्या पराभवाचा बदलाही भारताने घेतला. पाकिस्तानच्या ८ बाद १५९ धावांच्या प्रत्युत्तरात भारताने २० षटकांत ६ गड्यांच्या मोबदल्यात १६० धावा करत लक्ष्याचा पाठलाग केला. पाकिस्तानकडून हारिस रौफ आणि मोहम्मद नवाजने प्रत्येकी दोन, तर नसीम शाहने एक विकेट घेतली.