IPL 2023 KL Rahul Injury : आयपीएल 2023च्या मध्यात लखनऊ सुपर जायंट्सला मोठा धक्का बसला आहे. ESPNcricinfo च्या रिपोर्टनुसार, संघाचा कर्णधार केएल राहुल हिपच्या दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर पडला आहे. केएल राहुलला या आठवड्याच्या सुरुवातीला ही दुखापत झाली होती. आयपीएल 2023 मधून बाहेर पडल्यानंतर, 7 जूनपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध ओव्हल येथे होणार्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात त्याच्या खेळण्याबाबत शंका निर्माण झाली आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना केएल राहुलला उजव्या हिपला दुखापत झाली. त्याला सहकारी खेळाडूंच्या मदतीने मैदानाबाहेर काढावे लागले. बंगळुरूच्या डावातील दुसऱ्याच षटकात राहुलला दुखापत झाली. यानंतर तो क्षेत्ररक्षणासाठी उतरला नाही. मात्र, 127 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना लखनऊची स्थिती नाजूक असताना तो 11व्या क्रमांकावर फलंदाजीला आला. पण, तो इतका अडचणीत होता की त्याला धावता येत नव्हते. याच कारणामुळे शेवटचे षटक अमित मिश्राने खेळले. केएल राहुलशिवाय जयदेव उनाडकटलाही दुखापत झाली असून तो आयपीएलच्या उर्वरित सामन्यांमध्ये खेळणार नाही.
हेही वाचा – SBI Recruitment 2023 : स्टेट बँकेत ‘मोठ्या’ पगाराची नोकरी..! ‘असा’ भरा अर्ज
BREAKING: Lucknow Super Giants captain KL Rahul is ruled out of the IPL due to a hip injury#LSG | #IPL2023 pic.twitter.com/xbAFF6ctf4
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) May 5, 2023
लखनऊ सुपर जायंट्सने तो सामना 18 धावांनी गमावला. या सामन्यात विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात मैदानात वाद झाला आणि राहुलने तो शांत करण्याचा प्रयत्न केला. लखनौ सुपर जायंट्स सध्या पॉइंट टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. आता त्याच्या अनुपस्थितीत संघाचा उपकर्णधार कृणाल पांड्या कर्णधारपद भूषवणार आहे. चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्यात त्याने कर्णधारपद भूषवले होते. पण, सामना पावसात वाहून गेला.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!