पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 184 देशांपेक्षा ‘सरस’ ठरलेला खेळाडू, लिओन मर्चंड!

WhatsApp Group

Leon Marchand Paris 2024 Olympics : ऑलिम्पिक स्पर्धेत नेहमीच अप्रतिम कामगिरी पाहायला मिळते. कधी खेळात तर कधी आकडेवारीत. पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्येही हेच घडले. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये एका खेळाडूने इतकी चांगली कामगिरी केली की त्याला देशांच्या पदकतालिकेत ठेवले असते तर त्याची संख्या 186 देशांपेक्षा जास्त झाली असती. हा खेळाडू दुसरा कोणी नसून फ्रेंच जलतरणपटू लिओन मर्चंड आहे.

22 वर्षीय लिओन मर्चंडने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 4 सुवर्णांसह पाच पदके जिंकली. आपले दुसरे ऑलिम्पिक खेळत असलेल्या लिओन मार्चंडने वैयक्तिक स्पर्धांमध्ये 4 सुवर्णपदके जिंकली. त्याने 400 मीटर मेडले, 200 मीटर मेडले, 200 मीटर बटरफ्लाय, 200 मीटर ब्रेस्टस्ट्रोक या प्रकारात ही 4 पदके जिंकली. याशिवाय, लिओनने 4×100 मेडलेमध्ये रौप्यपदक जिंकले. लिओन मर्चंड अमेरिकन प्रशिक्षक बॉब बोमन यांच्या देखरेखीखाली सराव करतो, ते मायकेल फेल्प्सचेही प्रशिक्षक राहिले आहेत.

पॅरिस ऑलिम्पिकच्या पदकतालिकेवर नजर टाकली, तर केवळ 18 देश आहेत ज्यांनी 4 सुवर्ण आणि एक रौप्यपदके जिंकली आहेत. जर आपण आशियाई देशांबद्दल बोललो तर फक्त जपान, दक्षिण कोरिया आणि उझबेकिस्तानने लिओन मर्चंडपेक्षा अधिक सुवर्णपदके जिंकली आहेत. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला एकही सुवर्णपदक मिळालेले नाही.

हेही वाचा – Ben Stokes’ Injury : इंग्लंडच्या कसोटी कर्णधाराला रुग्णवाहिकेनं नेलं दवाखान्यात, पण लोक करतायत ट्रोल!

लिओन मर्चंड

ऑलिम्पिकमध्ये एकूण 204 देश सहभागी झाले होते, त्यापैकी 91 देशांनी पदके जिंकली. पाकिस्तानबद्दल बोलायचे झाले तर 76 वर्षांच्या ऑलिम्पिक इतिहासात पाकिस्तानने केवळ 4 सुवर्णपदके जिंकली आहेत. भारताच्या ऑलिम्पिक इतिहासात 10 सुवर्ण पदकांसह 41 पदके आहेत.

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये लिओन मर्चंडपेक्षा केवळ 18 देश अधिक सुवर्णपदक जिंकू शकले आहेत. या देशांमध्ये अमेरिका, चीन, जपान, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, नेदरलँड, ब्रिटन, दक्षिण कोरिया, इटली आणि जर्मनी यांचा समावेश आहे. याशिवाय न्यूझीलंड, कॅनडा, उझबेकिस्तान, हंगेरी, स्पेन, स्वीडन, केनिया, नॉर्वे आणि आयर्लंड यांनीही 4 किंवा त्याहून अधिक सुवर्णपदके जिंकली आहेत. आयर्लंडने 4 सुवर्ण आणि 3 कांस्यपदकांसह एकूण 7 पदके जिंकली आणि गुणतालिकेत ते 19 व्या क्रमांकावर राहिले. लिओन मर्चंडने 4 सुवर्ण आणि एक रौप्यपदक जिंकले आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment