‘दादा’गिरीला पुन्हा सुरुवात..! सौरव गांगुली क्रिकेटच्या मैदानात; करणार भारतीय संघाचं नेतृत्व!

WhatsApp Group

Legends League Cricket : भारताला या वर्षी स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. हा सोहळा खास बनवण्यासाठी देशात अमृत महोत्सवाचं आयोजन करण्यात येत आहे. यानिमित्तानं कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर एका खास क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात येणार आहे. हा सामना लिजेंड्स क्रिकेट लीग (LLC) अंतर्गत खेळवला जाईल. ही लीग १६ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. पण त्याच्या एक दिवस आधी म्हणजेच १५ सप्टेंबरला भारत महाराज आणि सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखालील वर्ल्ड जायंट्स यांच्यात सामना होणार आहे. हा सामना भारतीय स्वातंत्र्याच्या ७५व्या वर्षाच्या समारंभाला समर्पित असेल. आयोजकांनी शुक्रवारी ही माहिती दिली.

वर्ल्ड जायंट्सचे नेतृत्व मॉर्गनकडं!

‘इंडिया महाराजा’ संघाचे नेतृत्व भारताचा माजी कर्णधार आणि भारतीय क्रिकेट बोर्डाचा अध्यक्ष सौरव गांगुली करणार आहे, तर वर्ल्ड जायंट्सचे नेतृत्व इंग्लंडचा २०१९ विश्वचषक विजेता कर्णधार इऑन मॉर्गन करेल. या सामन्यात दहा देशांचे खेळाडू सहभागी होणार आहेत. लीगचा हा दुसरा हंगाम असून यामध्ये १५ सामने खेळवले जाणार आहेत. LLCची दुसरी स्पर्धा या विशेष सामन्याच्या दुसऱ्या दिवशी १६ सप्टेंबर रोजी सुरू होईल. या स्पर्धेत चार संघ सहभागी होणार आहेत आणि २२ दिवसांत १५ सामने खेळवले जातील.

हेही वाचा – प्रकरण हाताबाहेर..! क्रिकेटर ऋषभ पंत आणि उर्वशी रौतेलाचा नक्की ‘मॅटर’ काय? वाचा!

रवी शास्त्री म्हणाले…

LLCचे उपायुक्त रवी शास्त्री यांनी एका निवेदनात म्हटलं, “आम्ही आमचे स्वातंत्र्याचे ७५ वे वर्ष साजरे करत आहोत हा आमच्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. यावर्षी ही लीग या खास सोहळ्यासाठी समर्पितत असेल.” लिजेंड्स लीग क्रिकेटचा पहिला सीझन या वर्षी जानेवारीमध्ये मस्कत येथे इंडिया महाराजा, वर्ल्ड जायंट्स आणि एशिया लायन्स या तीन संघांमध्ये खेळला गेला आणि त्यात एकूण ७ सामने झाले. सीझन दोनमध्ये चार संघ भाग घेतील.

दोन्ही संघ

इंडिया महाराजा : सौरव गांगुली (कर्णधार), वीरेंद्र सेहवाग, युसूफ पठाण, मोहम्मद कैफ, एस. बद्रीनाथ, इरफान पठाण, पार्थिव पटेल, स्टुअर्ट बिन्नी, एस. श्रीशांत, हरभजन सिंग, नमन ओझा, अशोक दिंडा, प्रज्ञान ओझा, अजय जडेजा, आरपी सिंह, जोगिंदर शर्मा, रितेंदर सिंग सोधी.

हेही वाचा – ‘लाल सिंग चड्ढा’ पाहून इंग्लंडचा क्रिकेटर चांगलाच संतापला; म्हणाला, “लज्जास्पद…”

वर्ल्ड जायटंस : इऑन मॉर्गन (कर्णधार), लेंडल सिमन्स, हर्शल गिब्स, जॅक कॅलिस, सनथ जयसूर्या, मॅट प्रायर, नॅथन मॅक्युलम, जॉन्टी रोड्स, मुथय्या मुरलीधरन, डेल स्टेन, हॅमिल्टन मसाकादझा, मशरफे मोर्तझा, असगर अफगाण, मिचेल जॉन्सन, ब्रेट लेसन, केविन ओब्रायन, दिनेश रामदिन.

Leave a comment