VIDEO : वसीम अक्रमचे रॅप गायन, हसून हसून अँकर बेजार!

WhatsApp Group

पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी वेगवान गोलंदाज वसीम अक्रम हा आपल्या स्पष्ट मतांसाठी ओळखला जातो. मैदानात भल्याभल्या फलंदाजांची भंबेरी उडवणारा वसीम आता एका नव्या व्हिडिओमुळे चर्चेत आला आहे. वसीमने आपल्या रॅपिंग कौशल्याने सर्व चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले. पाकिस्तानमधील टीव्ही चॅनेलवरील कार्यक्रमाच्या अँकरने वसीमला रॅप करण्यास सांगितले. यानंतर 57 वर्षीय वसीमने एक जबरदस्त रॅप गायला (Wasim Akram’s Rap Song), जो ऐकून अँकरही आपले हसणे थांबवू शकला नाही.

हेही वाचा – या श्रीमंत माणसाकडे 300 फेरारी, 500 रोल्स रॉयस, 450 मर्सिडीज आणि सोन्याचे विमान आहे!

वसीम अक्रमच्या या रॅपचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप पसंत केला जात आहे. वसीम एका स्पोर्ट्स शो ‘द पॅव्हेलियन’ मध्ये एक्स्पर्ट म्हणून सहभागी होतो. त्याच्याशिवाय मिसबाह-उल-हक, मोईन खान आणि शोएब मलिकही या कार्यक्रमाचा भाग आहे. हा शो भारतातही पाहिला जातो. शो दरम्यान, वर्ल्डकपशी संबंधित अनेक मुद्द्यांवर रंजक पद्धतीने चर्चा केली जाते, किस्से सांगितले जातात.

या शो दरम्यान, अँकरने वसीम अक्रमला मजेदार मूडमध्ये रॅप करण्यास सांगितले. यानंतर वसीमने, ‘तू मेरे पास आ मैं तेरे साथ जाऊं, तेरा अब्बू आएगा तेरी अम्मी से पूछेगा, तू मेरे घर आ’ अक्रमचा हा रॅप ऐकल्यानंतर शोचे सर्व पाहुणे आणि अँकर जोरजोरात हसायला लागतात.

भारत-न्यूझीलंड सेमीफायनल

टीम इंडिया वनडे वर्ल्डकप 2023 चे विजेतेपद मिळवण्यापासून 2 विजय दूर आहे. उपांत्य फेरीत भारताचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे. हा सामना 15 नोव्हेंबर रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर दुपारी 2 पासून खेळवला जाईल. गेल्या वर्ल्डकपमध्ये किवी संघाने भारताला स्पर्धेतून बाहेर काढले होते. भारताने आजपर्यंत न्यूझीलंडला बाद फेरीत हरवलेले नाही.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment