ऑक्शनमध्ये चुकून खरेदी केला प्लेयर, 20 लाख किंमत, कोण आहे पंजाब किंग्जचा शशांक सिंह?

WhatsApp Group

आयपीएल 2024 च्या ऑक्शनमध्ये (IPL 2024 Auction) अनेक खेळाडूंवर विक्रमी बोली लागली. त्यानंतर अभिनेत्री प्रिती झिंटाच्या मालकीच्या पंजाब किंग्ज (Punjab Kings) संघाने चुकून शशांक सिंह नामक खेळाडू विकत घेतल्याच्या बातम्या समोर आल्या. काही रिपोर्ट्समध्ये असे सांगण्यात आले की पंजाबला 19 वर्षीय शशांक सिंहला संघात घ्यायचे होते, पण त्यांनी चुकून 32 वर्षाच्या दुसऱ्या शशांक सिंहला 20 लाख रुपये देऊन संघात घेतले. पण त्यानंतर पंजाबने एक स्पष्टीकरण दिले.

पंजाब किंग्जने सोशल मीडियाच्या माध्यमातून स्पष्टीकरण दिले आणि खेळाडूला संघात घेतल्याने आनंद होत असल्याचे सांगितले. “पंजाब किंग्ज हे स्पष्ट करू इच्छितो की हा खेळाडूही आमच्या खरेदीच्या यादीत होता. यादीत समान नाव असलेल्या दोन खेळाडूंची नावे दिसल्याने गोंधळ निर्माण झाला. शशांक सिंह संघात सामील करून घेताना आम्हाला आनंद होत आहे. आम्ही आमच्या यशासाठी त्याला योगदान देताना पाहू इच्छितो.” त्यानंतर शशांकनेही सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून विश्वास दाखवल्याबद्दल टीमचे आभार मानले आहेत.

हेही वाचा – मार्च 2024 मध्ये टोल वसुलीची पद्धत बदलणार, GPS सिस्टीम येणार!

कोण आहे शशांक सिंह?

शशांक सिंह यापूर्वी आयपीएलमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्स (आता दिल्ली कॅपिटल्स), राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबादचा भाग राहिला होता. शशांकने आयपीएल 2022 मध्ये पदार्पण केले. त्याने संपूर्ण हंगामात एकूण 10 सामने खेळले. शशांकने हैदराबादकडून 10 सामन्यात 69 धावा केल्या होत्या. त्याचवेळी त्याने 1 सामन्यात गोलंदाजीतून केवळ 12 धावा दिल्या. पण देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याने चांगली कामगिरी केली आहे. शशांकने 30 लिस्ट ए सामन्यात 985 धावा केल्या आहेत. आता तो आयपीएलच्या 17 व्या मोसमात पंजाबची जर्सी घालणार आहे.

पंजाब किंग्ज संघ

शिखर धवन (कर्णधार), मॅथ्यू शॉर्ट, प्रभसिमरन सिंग, जितेश शर्मा, सिकंदर रझा, ऋषी धवन, लियाम लिव्हिंगस्टोन, अर्थव तायडे, अर्शदीप सिंग, नॅथन एलिस, सॅम करन, कगिसो रबाडा, हरप्रीत ब्रार, राहुल चहर आणि हरप्रीत भाटिया.

ऑक्शनमध्ये खरेदी केलेले खेळाडू

हर्षल पटेल, ख्रिस वोक्स, आशुतोष शर्मा, विश्वनाथ प्रताप सिंग, शशांक सिंह, तनय त्यागराजन, प्रिन्स चौधरी आणि रायली रुसो.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment