

Sam Konstas : ऑस्ट्रेलियाच्या 19 वर्षीय सॅम कॉन्स्टसने भारतीय संघाविरुद्धच्या बॉक्सिंग डे कसोटीत पदार्पणातच धमाल उडवून दिली. सामन्यापूर्वी सॅमची चर्चा होत होती. वेगवान खेळी करताना सॅम कॉन्स्टसने जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांनाही बुचकळ्यात टाकले. पहिल्या सत्रात येताना सॅमने केवळ धावाच केल्या नाहीत तर भारतीय खेळाडूंशी पंगा घेतला. विराट कोहलीसोबत त्याची झटापट झाली पण 19 वर्षीय सॅम घाबरला नाही.
ऑस्ट्रेलियाचा युवा सलामीवीर सॅम कॉन्स्टसच्या कसोटी पदार्पणाची बरीच चर्चा होती. पहिल्या सामन्याच्या पहिल्या डावात त्याने ज्या प्रकारे निर्भयपणे फलंदाजी केली त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दमदार सुरुवात झाली. बॉक्सिंग डे कसोटीच्या पहिल्या दिवसाच्या पहिल्या सत्रात, सॅम कॉन्स्टसने जसप्रीत बुमराहसारख्या गोलंदाजाला रिव्हर्स रॅम्प शॉट सिक्स मारला शिवाय विराट कोहलीलाही नडण्यात मागे हटला नाही.
WHAT ARE WE SEEING!
— cricket.com.au (@cricketcomau) December 26, 2024
Sam Konstas just whipped Jasprit Bumrah for six 😱#AUSvIND | #PlayOfTheDay | @nrmainsurance pic.twitter.com/ZuNdtCncLO
विराटने काय केलं?
कॉन्स्टसने त्या भारतीय खेळाडूचाही सामना केला ज्याच्याशी खेळण्याआधी खेळाडू शंभर वेळा विचार करतात. ऑस्ट्रेलियासाठी स्वप्नवत पदार्पण करणाऱ्या सॅम कॉन्स्टसने 65 चेंडूत 60 धावांची जलद खेळी केली. यात दोन दमदार षटकारांचा समावेश होता. दरम्यान त्याला विराट कोहलीने धडक दिली. जेव्हा त्याला धक्का बसला, तेव्हा त्याने गप्प बसण्याऐवजी विराटला बेधडक नजरेने उत्तर दिले. प्रकरण वाढत असल्याचे पाहून उस्मान ख्वाजाने तेथे येऊन हस्तक्षेप केला.
Virat Kohli and Sam Constas shared a heated moment on the MCG.#INDvAUS #ViratKohli #samconstas#fight #testmatch pic.twitter.com/GhPAAxPUw9
— Harshwardhan Rathod (@Officialharsha) December 26, 2024
कॉन्स्टसने कसोटी पदार्पणातच तुफानी इनिंग खेळून सर्वांनाच आपले फॅन बनवले. ऑस्ट्रेलियासाठी अर्धशतक झळकावणारा तो दुसरा सर्वात तरुण खेळाडू ठरला. सर्वात तरुण ऑस्ट्रेलियन खेळाडूचा विक्रम इयान क्रेगच्या नावावर आहे. त्याने 17 वर्षे 240 दिवस वयात अर्धशतक झळकावले. कॉन्स्टसने 19 वर्षे 85 दिवस वयात अर्धशतक झळकावून या यादीत दुसरे स्थान मिळवले. कॉन्स्टसच्या या खेळीने ऑस्ट्रेलियाला कसोटीच्या सुरुवातीच्या टप्प्यात मजबूत स्थितीत आणले. त्याला रवींद्र जडेजाने 60 धावांवर बाद केले.
कॉन्स्टसने कसोटी पदार्पणातच भारताविरुद्ध अर्धशतक झळकावणारा सर्वात तरुण खेळाडू बनून इतिहास रचला. पाकिस्तानच्या मुश्ताक मोहम्मद आणि शाहिद आफ्रिदी यांनीही भारताविरुद्ध कसोटी अर्धशतके झळकावली आहेत, परंतु त्यांची दोन्ही अर्धशतके कसोटी पदार्पणातच झाली नाहीत. भारताविरुद्ध कसोटी पदार्पणातच अर्धशतक झळकावणारा कॉन्स्टस हा 20 वर्षांखालील पहिला खेळाडू ठरला.
हेही वाचा – LPG च्या किमतीपासून पेन्शनपर्यंत…नवीन वर्षापासून होणार ‘हे’ 5 मोठे बदल!
मेलबर्न कसोटीत ऑस्ट्रेलियाचा युवा सलामीवीर सॅम कॉन्स्टसने जसप्रीत बुमराहविरुद्ध धाडसी कामगिरी करत तीन वर्षे जुना विक्रम मोडला. 19 वर्षीय कॉन्स्टसने भारतीय वेगवान गोलंदाज बुमराहविरुद्ध रिव्हर्स रॅम्प शॉट खेळला आणि दोन चौकार आणि एक षटकार लगावला. विशेष बाब म्हणजे बुमराहने कसोटी क्रिकेटमध्ये 1,112 दिवस आणि 4,483 चेंडूंनंतर षटकार खाल्ला आहे. यापूर्वी 2021 मध्ये कॅमेरून ग्रीनने सिडनीमध्ये त्याच्याविरुद्ध षटकार ठोकला होता. सॅम कॉन्स्टसने पहिल्या डावातील 23व्या चेंडूवर हा अप्रतिम शॉट मारला, ज्यामुळे प्रेक्षकांमध्ये खळबळ उडाली.
सॅम कॉन्स्टस कोण आहे?
* डिसेंबर 2024 मध्ये कॉन्स्टसने बिग बॅश लीगमध्ये सिडनी थंडरसाठी पदार्पण केले.
* डेव्हिड वॉर्नरसह ओपनिंग करताना कॉन्स्टसने अवघ्या 26 चेंडूत 57 धावांची तुफानी इनिंग खेळली. कॉन्स्टसने सिडनी थंडरच्या इतिहासातील सर्वात जलद अर्धशतक झळकावले. या खेळीत त्याने 8 चौकार आणि 2 षटकार मारले.
* कॉन्स्टसने मनुका ओव्हल येथे भारताविरुद्ध पंतप्रधान इलेव्हनचे प्रतिनिधित्व केले आणि 97 चेंडूत 107 धावा केल्या. या खेळीत त्याने 14 चौकार आणि 1 षटकार मारला. यामुळे कॉन्स्टसला अधिक ओळख मिळाली.
* ऑक्टोबर-नोव्हेंबर 2024 मध्ये, कॉन्स्टसला भारत अ विरुद्ध ऑस्ट्रेलिया अ संघात संधी मिळाली. दुसऱ्या अनधिकृत कसोटीत त्याने दुसऱ्या डावात नाबाद 73 धावा केल्या. त्यामुळे संघाने विजयाची नोंद केली.
* कॉन्स्टसने 11 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 42.23 च्या सरासरीने 718 धावा केल्या.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!