MS Dhoni Net Worth : एका वर्षात ‘इतके’ कोटी कमावतो महेंद्रसिंह धोनी!

WhatsApp Group

MS Dhoni Net Worth : महेंद्रसिंह धोनी जगातील सर्वोत्तम विकेटकीपर, फिनिशर आणि महान कर्णधारांमध्ये गणला जातो. त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने टी-20 विश्वचषक, एकदिवसीय विश्वचषक आणि आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसह तीनही प्रमुख आयसीसी विजेतेपदे जिंकली. धोनीने त्याच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जला 5 वेळा चॅम्पियन बनवण्याचा विक्रम केला, तर 2 वेळा चॅम्पियन्स लीगचे विजेतेपदही पटकावले. टीम इंडियाचा माजी कर्णधार धोनीला चेन्नई सुपर किंग्जने आयपीएल 2023 साठी 12 कोटींमध्ये कायम ठेवले होते.

Knowledge.com या वेबसाइटनुसार, धोनी 1070 कोटींचा मालक आहे. त्याचे मासिक उत्पन्न 4 कोटींहून अधिक आहे तर एका वर्षात तो 50 कोटींहून अधिक कमावतो. त्याचे आयपीएलचे मानधन 12 कोटी आहे. धोनीने भले आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असेल पण तरीही तो आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार आहे. तो पुढील वर्षी म्हणजेच आयपीएल 2024 मध्येही खेळताना दिसणार आहे.

धोनीने वयाच्या 39व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला. त्याने 15 ऑगस्ट 2020 रोजी सोशल मीडियाच्या माध्यमातून निवृत्तीची घोषणा केली. धोनी रांचीमध्ये राहतो. धोनीचा रांचीमध्ये आलिशान बंगला आहे. धोनीचा मुंबईतही बंगला आहे. इतकेच नाही तर धोनीने 2011 मध्ये डेहराडूनमध्ये 17 कोटींहून अधिक रुपयांचा बंगलाही खरेदी केला होता.

हेही वाचा – Gold Silver Price Today : सोने, चांदी पुन्हा महागले! मिस कॉल देऊन जाणून घ्या आजचा दर

धोनीकडे जगातील आलिशान गाड्या आहेत, ज्यामध्ये हमर, पोर्श 911, ऑडी, मर्सिडीज, मित्सुबिशी पजेरो, रेंज रोव्हर आणि अनेक गाड्या त्याच्या गॅरेजला शोभून आहेत. एवढेच नाही तर बाईकबद्दल बोलायचे झाले तर त्याच्याकडे Harley Davidson Fat Boy, Kawasaki Ninja H2 आणि Confederate Hellcat X32 या बाईक्स आहेत.

धोनीच्या मालकीच्या 7 लक्झरी गाड्यांची किंमत सुमारे 12.5 आहे. त्याvs अनेक ठिकाणी सुमारे 620 कोटींची गुंतवणूकही केली आहे. याशिवाय त्याची टी-20 मॅच फी 2 लाख आहे तर रिटेनर फी 1 कोटी आहे. त्याची एकूण संपत्ती 1070 कोटी आहे.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment