Perfume Ball : तसे, क्रिकेटमध्ये अनेक नियम आणि वेगवेगळ्या संज्ञा आहेत. वाइड बॉल, नो बॉल, बाऊन्सर या गोष्टी तुम्ही ऐकल्याच असतील. पण तुम्ही कधी परफ्यूम बॉलबद्दल ऐकले आहे का? जर नसेल तर या लेखात तुम्हाला याविषयी माहिती मिळेल. परफ्यूम बॉल हा क्रिकेटमधील असा बॉल आहे, जो जाणीवपूर्वक फलंदाजांना टाकला जातो.
परफ्यूम बॉल म्हणजे असा बॉल जो बाऊन्सर असतो. जेव्हा बॉलर बॅट्समनला बाऊन्सर टाकतो तेव्हा बॉल त्याच्या किती जवळ गेला ते बघितलं जातं. जेव्हा बॉल फलंदाजाच्या चेहऱ्याच्या अगदी जवळ जातो आणि फलंदाजाला बॉलचा वास येतो तेव्हा त्याला परफ्यूम बॉल म्हणतात.
हेही वाचा – WI Vs IND 1st Test : विंडीजच्या ‘बड्या’ खेळाडूसमोर शुबमन गिलचा डान्स! पाहा Video
बॉलवर एक रंग असतो. त्याचा सुगंध येतो. असा बॉल कोणत्याही खेळाडूच्या हेल्मेटला लागला तर लगेच हेल्मेट तपासले जाते. गेल्या काही वर्षांत बाऊन्सर टाकण्याचा कल खूप वेगाने वाढला आहे. पाकिस्तान, इंग्लंड, ऑस्ट्रेलिय प्रत्येक देशाचे गोलंदाज त्याचा भरपूर वापर करतात.
एकंदरीत, मुद्दा असा आहे की कोणत्याही फलंदाजाला परफ्यूम बॉलला सामोरे जावेसे वाटणार नाही. 2014 मध्ये ऑस्ट्रेलियाचा सर्वोत्तम फलंदाज फिलिप ह्यूजचा मानेला चेंडू लागल्याने मृत्यू झाला होता. त्यावेळी सीन अॅबॉट नावाच्या गोलंदाजाने त्याला देशांतर्गत सामन्यात बाऊन्सर टाकला होता.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!