VIDEO : केएल राहुलचा जबरदस्त कॅच, पुणेकरांचा स्टेडियममध्ये जल्लोष!

WhatsApp Group

IND vs BAN KL Rahul Stunning Catch In Marathi : टीम इंडियाचा यष्टीरक्षक केएल राहुलने बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात जबरदस्त कॅच घेतला. पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर भारत विरुद्ध बांगलादेश रंगत आहे. नाणेफेक जिंकून बांगलादेशने प्रथम फलंदाजी घेतली. उत्तम सुरुवातीनंतर बांगलादेशचा डाव गडगडला. वर्ल्डकपमध्ये उत्तम लयीत असलेल्या राहुलने यष्टीरक्षणातही जबरदस्त कामगिरी केली.

डावाच्या 25व्या षटकात मोहम्मद सिराजने मेहदी हसन मिराजला तंबूत धाडले. लेग स्टम्पवर टाकलेली क्रॉस सीम चेंडू मिराजच्या बॅटची कड घेऊन पाठी गेला. राहुलने आपल्या डाव्या बाजूला सूर मारत तो अचूक टिपला. राहुलच्या या जबरदस्त कॅचनंतर भारताचे सर्व खेळाडू त्याचे कौतुक करण्यासाठी धावले. स्टेडियममध्ये उपस्थित चाहत्यांनीही राहुलसाठी (KL Rahul Catch) घोषणा दिल्या. मिराजला फक्त 3 धावा करता आल्या.

हेही वाचा – VIDEO : गोलंदाज विराट कोहली…एका ओव्हरमध्ये फक्त 3 चेंडू टाकले!

या सामन्यासाठी दोन्ही संघ (IND vs BAN)

भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

बांगलादेश : लिटन दास, तनजीद तमीम, मेहदी हसन मिराज, नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), नसुम अहमद, मुशफिकुर रहीम (यष्टीरक्षक), तौहीद हृदोय, महमुदुल्लाह, हसन महमूद, मुस्तफिजुर रहमान, शरीफुल इस्लाम.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment