IPL 2023 KKR vs SRH Harry Brook Century : सनरायझर्स हैदराबादचा सलामीवीर बॅट्समन हॅरी ब्रूकने यंदाच्या सीजनची पहिली सेंच्युरी ठोकली आहे. त्याने कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध (KKR vs SRH) हा कारनामा केला. ब्रूकने 55 चेंडूत शतक साकारले. 20व्या षटकात तिसऱ्या चेंडूवर ब्रूकने एक धाव घेत जल्लोष साजरा केला. ब्रूकच्या शतकाच्या जोरावर हैदराबादने 20 षटकात 4 बाद 228 धावांचा डोंगर उभारला. ब्रूकने 12 चौकार 3 षटकार मारले. तो हैदराबादचा यंदाचा महागडा खेळाडू आहे. त्याच्यासाठी सव्वा 13 कोटी मोजले आहेत.
हेही वाचा – Bike Car CC : गाड्यांमधील सीसी म्हणजे काय? तुम्हाला माहितीये? जाणून घ्या!
Harry Brook scored a scintillating TON and became the maiden centurion of #TATAIPL 2023 👏👏
He becomes our 🔝 performer from the first innings of the #KKRvSRH clash 👌🏻
A look at his batting summary 🔽 pic.twitter.com/oe3dJdiTl4
— IndianPremierLeague (@IPL) April 14, 2023
Harry Brook said "My Girl Friend is here, rest of the family just left, I am sure they will be very happy for me". pic.twitter.com/ePQvKTzES8
— Johns. (@CricCrazyJohns) April 14, 2023
दोन्ही संघांची Playing 11
कोलकाता नाइट रायडर्स – रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), एन. जगदीशन, नितीश राणा (कप्तान), रिंकू सिंग, आंद्रे रसेल, सुनील नरिन, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, सुयश शर्मा, लॉकी फर्ग्युसन, वरुण चक्रवर्ती.
सनरायझर्स हैदराबाद – हैरी ब्रूक, मयंक अग्रवाल, राहुल त्रिपाठी, एडेन मार्करम (कप्तान), अभिषेक शर्मा, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), मार्को जानसेन, भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे, उमरान मलिक, टी. नटराजन.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!