IPL 2024 : गौतम गंभीर आता ‘या’ संघाचा कोच? लखनऊ आणणार ‘नवा’ महागुरू?

WhatsApp Group

Gautam Gambhir : आयपीएल 2024 पूर्वी गौतम गंभीर कोलकाता नाइट रायडर्स (KKR) फ्रेंचायझीमध्ये परत येऊ शकतो. कर्णधार असताना गंभीरने KKR ला दोन आयपीएल ट्रॉफी मिळवून दिल्या होत्या. आयपीएल 2023 मध्ये लखनऊ सुपर जायंट्स (LSG) संघाचा प्रवास गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर संपुष्टात आला. दरम्यान, लखनऊने पुढील आयपीएल हंगामाची तयारीही सुरू केली आहे. म्हणजेच आयपीएल 2024 मध्ये लखनऊ सुपरजायंट्स संघात नवीन मुख्य प्रशिक्षक दिसणार आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, आयपीएल फ्रेंचायझी लखनऊ सुपर जायंट्सने इंडियन प्रीमियर लीगमध्ये मुख्य प्रशिक्षक म्हणून संघाची जबाबदारी घेण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या जस्टिन लँगर यांच्याशी संपर्क साधला आहे. लखनऊ व्यवस्थापनाने जस्टिन लँगर यांच्याशी विस्तृत चर्चा केली आहे आणि जर सर्व काही ठीक झाले तर ते पुढील वर्षी संघात असू शकतात. संजीव गोएंका यांची फ्रेंचायझी लखनऊला मुख्य प्रशिक्षकाची गरज आहे. त्यांचा अँडी फ्लॉवरसोबतचा दोन वर्षांचा करार या आयपीएलनंतर संपत आहे.

हेही वाचा – 19 वर्षानंतर येतोय टाटा ग्रुपचा IPO! 200% फायदा होण्याची शक्यता

सॅंडपेपर घोटाळ्यानंतर जस्टिन लँगर यांनी ऑस्ट्रेलियन संघाची जबाबदारी स्वीकारली आणि त्यांनी उत्कृष्ट काम केले. कारण त्यांच्या नेतृत्वाखाली संघाने स्टार खेळाडूंशिवायही चमत्कार केले. 2021 च्या टी-20 विश्वचषकातही त्यांनी संघाला विजय मिळवून दिला आणि त्यांच्या प्रशिक्षणाखाली पर्थ स्कॉचर्सने त्यांच्या पहिल्या चार वर्षांत तीन बिग बॅश लीग विजेतेपदे जिंकली. लखनऊ सुपर जायंट्स आणि जस्टिन लँगर यांच्यातील चर्चा चांगली राहिल्यास, ते मॉर्नी मॉर्केल, जॉन्टी रोड्स आणि विजय दहिया यांच्यासह लखनऊच्या कोचिंग स्टाफचा भाग होतील.

लखनऊ सुपर जायंट्स आयपीएल 2023मध्ये प्लेऑफसाठी पात्र ठरला. आयपीएल 2022 मध्ये त्यांनी चमकदार कामगिरी केली. यामुळे, तो स्पर्धेतील अव्वल संघांपैकी एक होता. लखनऊने या मोसमातही प्लेऑफसाठी पात्रता मिळवली पण अंतिम फेरीत प्रवेश मिळवण्यात अपयश आले.

आयपीएल 2023 च्या एलिमिनेटरमध्ये त्यांना मुंबई इंडियन्सविरुद्ध निराशाजनक पराभवाला सामोरे जावे लागले. यामुळे त्यांना आयपीएल 2023 मधून बाहेर व्हावे लागले. आता पुढच्या मोसमात लीगमधील पहिले विजेतेपद जिंकण्याच्या आशेने तो मैदानात उतरेल.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment