VIDEO : पोलार्ड तात्याचा 110 मीटर गगनचुंबी षटकार, बॉल स्टेडियमबाहेर!

WhatsApp Group

Kieron Pollard : कायरन पोलार्डने अमेरिकेत सुरू असलेल्या मेजर लीग क्रिकेट स्पर्धेत 110 मीटर लांब षटकार ठोकला आहे. या स्पर्धेतील आतापर्यंतचा हा सर्वात लांब षटकार आहे. एमआय न्यूयॉर्क आणि सिएटल ऑर्कास यांच्यातील सामन्यात पोलार्डने हा पराक्रम केला. पोलार्ड मेजर लीग क्रिकेटमधील मुंबई इंडियन्सच्या फ्रेंचायझीशी संबंधित असलेल्या एमआय न्यूयॉर्कचा कर्णधार आहे. या सामन्यात पोलार्डने 18 चेंडूत 189 च्या स्ट्राईक रेटने 34 धावा केल्या. त्याने आपल्या डावात 1 चौकार आणि 3 षटकार मारले. असे असतानाही पोलार्डचा संघ सामना हरला.

एमआय न्यूयॉर्कचा कर्णधार पोलार्डने 12व्या षटकात कॅमेरॉन गॅमनला 110 मीटर षटकार ठोकला. लहान स्टेडियममुळे चेंडू थेट मैदानाबाहेर पडला. पोलार्डने या डावात एकूण 3 षटकार ठोकले. या सामन्यात पोलार्ड पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आला आणि त्याने अवघ्या 18 चेंडूत 34 धावा ठोकल्या. त्याच्या खेळीच्या बळावर एमआय न्यूयॉर्कने 20 षटकांत 8 गडी गमावून 194 धावा केल्या.

हेही वाचा – Excessive Yawning : दिवसभर जांभया येत असतील तर सावधान, वेळीच ओळखा ही लक्षणे!

पोलार्डचा झेल त्याच गॅननने पकडला. पोलार्डशिवाय निकोलस पूरननेही 68 धावांची तुफानी खेळी केली. हेन्रिक क्लासेनच्या नाबाद शतकाच्या जोरावर सिएटल ऑर्कास संघाने विजयासाठी 195 धावांचे लक्ष्य गाठले.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment